Sangamner Crime News Update | संगमनेर : संगमनेर (Sangamner) येथील नवीन नगर रोड येथे चार साधूंना दोन जणांनी मारहाण केल्याप्रकरणी एका जणाला पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले असून एकजण पसार झाला आहे. तरी संगमनेरकरांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करू नये, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांनी केले आहे.
अवश्य वाचा – आता मुख्यमंत्र्यांनी सांगितले तरी माघार नाही; भाऊसाहेब कांबळे यांचा पत्रकार परिषदेत निर्धार
रस्त्यात अडवून मारहाण (Sangamner Crime News Update)
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चार साधू वेशातील लोक हे जठार हॉस्पिटल पाठीमागून नवीन नगर रोडकडे जात असताना दोन अनोळखी तरुणांनी त्यांना रस्त्यात अडवून मारहाण केली होती. पोलिसांनी तत्काळ सदर ठिकाणी जात सीसीटीव्ही फुटेज व मिळालेल्या व्हिडीओवरुन त्या दोन अनोळखी तरुणांची ओळख पटविण्यात आली. त्यांचा शोध सुरू करण्यात आला. साधू वेशातील चार इसमांपैकी विलास मारुती वडागळे (रा. सिध्दार्थ नगर, म्युन्सिपल कॉलनी, लक्ष्मीमाता मंदिराच्या बाजूला, अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला.
हेही वाचा – संग्राम जगताप यांना नगर शहरातून माझ्यापेक्षा अधिक लीड देवून विजयी करा : डॉ.सुजय विखे पाटील
आरोपी ताब्यात (Sangamner Crime News Update)
याप्रकरणी नईम सुलतान शेख यास ताब्यात घेतले आहे. तर अजय बबन साळवे हा पसार झाला आहे. सद्यस्थितीत संगमनेर शहर पोलीस ठाणे हद्दीत शांतता आहे. कुणीही कोणत्याही प्रकारे अफवा पसरवू नये. कोणत्याही व्यक्तीने कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास अथवा सदर घटनेबाबत कोणीही अफवा पसरविल्यास त्याचे विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही पोलीस उपअधीक्षक डॉ. सोनवणे म्हणाले.