Sangamner : संगमनेर बसस्थानकातील बसची दयनीय अवस्था 

Sangamner : संगमनेर बसस्थानकातील बसची दयनीय अवस्था 

0
Sangamner : संगमनेर बसस्थानकातील बसची दयनीय अवस्था 
Sangamner : संगमनेर बसस्थानकातील बसची दयनीय अवस्था 

Sangamner : संगमनेर : एकीकडे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) प्रवाशांच्या सोयीसाठी गतिमान आणि आधुनिक सुविधा देण्याच्या गप्पा मारत आहे, तर दुसरीकडे प्रवाशांना मोडकळीस आलेल्या बसेसमधून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. संगमनेरहून (Sangamner) अश्वीला जाणाऱ्या एसटी बसची (ST Bus) अत्यंत दयनीय अवस्था पाहायला मिळाली. या बसमध्ये ना खिडक्या होत्या, ना व्यवस्थित दारं, तर छप्परही अक्षरशः ढासळण्याच्या स्थितीत होतं. अशा मोडकळीस बसने प्रवास करणं म्हणजे जीव मुठीत धरून प्रवास करण्यासारखं आहे. 

अवश्य वाचा : मढी ग्रामसभेतील ठरावाचे जिल्हाभर पडसाद

धोकादायक स्थितीतील बस मधुनच करावा लागतो प्रवास

संगमनेर बसस्थानकातून बाहेर पडणारी एक एस.टी. बस याच वास्तवाची जाणीव करून देते. या बसला खिडक्या नाहीत, बाह्यरचना तुटलेली आहे, छप्पर देखील धोकादायक स्थितीत आहे. तरीही प्रवासी हीच बस वापरून प्रवास करत आहेत, कारण त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. संगमनेर बसस्थानकातून प्रवासी घेऊन बाहेर पडणाऱ्या या बसची अवस्था इतकी खराब होती की प्रवाशांनी स्वतःच याकडे लक्ष वेधलं. बसच्या खिडक्यांच्या जागी फक्त फ्रेम उरल्या होत्या, अनेक ठिकाणी पत्रा उघडलेला होता, आणि दरवाजे व्यवस्थित बंद होत नव्हते. दुसरा कोणताही पर्याय नसल्याने प्रवाशांनी जीव धोक्यात घालून प्रवास केला.

नक्की वाचा : ‘नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत’ 3 हजार रुपये वाढून देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, (Sangamner)

“महामंडळाच्या बसेसची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. आम्ही दररोज जीव मुठीत धरून प्रवास करतो. सरकार जाहिरातींमध्ये गतिमानतेच्या मोठ्या घोषणा करत असले, तरी प्रत्यक्षात परिस्थिती भयंकर आहे.” महामंडळ एकीकडे ‘गतिमान महाराष्ट्र’ आणि ‘प्रगत एस.टी.’ अशा घोषणा देत असलं तरी प्रत्यक्षात प्रवाशांना हीच जीर्ण आणि धोकादायक बसेस वापराव्या लागत आहेत. प्रवाशांनी आता सरकार आणि परिवहन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं, या मोडकळीस आलेल्या बसेस तात्काळ बंद करून नवीन बसेस सुरू कराव्यात, अशी मागणी केली आहे.

दररोज शेकडो प्रवासी संगमनेर-अश्वी मार्गावर प्रवास करतात. मात्र, जर एस.टी. महामंडळाने अशाच मोडकळीस बस सुरू ठेवल्या, तर मोठ्या अपघाताला निमंत्रण मिळू शकतं. प्रवाशांनी आता सरकारकडे विचारणा केली आहे – “आमचा प्रवास सुरक्षित होणार की अजून धोकादायक?” स्थानिक प्रशासन आणि परिवहन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ही मोडकळीस आलेली वाहने तत्काळ बंद करून नवीन बसेस सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.