Sangamner News:संगमनेरच्या १०७ वर्षांच्या आजीबाई सांगतात दीर्घायुष्याचे रहस्य!

0
Sangamner News:संगमनेरच्या १०७ वर्षांच्या आजीबाई सांगतात दीर्घायुष्याचे रहस्य!
Sangamner News:संगमनेरच्या १०७ वर्षांच्या आजीबाई सांगतात दीर्घायुष्याचे रहस्य!

Sangamner News: उत्तम आरोग्य हीच सुखी जीवनाची गुरुकिल्ली असते.मात्र सध्याच्या पिढीला तारुण्यातच व्याधी जाणवायला लागतात.या सगळ्याला संगमनेर (Sangamner) तालुक्यातील वडगाव पान (Vadgaon Pan) गावातील १०७ वर्षांच्या आजी अपवाद ठरल्या आहेत. इथं तिशीतच आपले हात पाय गळतात. मात्र १०७ वर्षाच्या आजीबाई (107-year-old grandmother) शंभरीनंतर ही खंबीर आहेत.लक्ष्मीबाई कारभारी शिंदे असं या आजीचं नावं. वयाची १०७ वर्ष उलटली तरी आजींची तब्येत अजूनही उत्तम आहे.

नक्की वाचा : राज्यसभेतही वक्फ सुधारणा विधेयक मध्यरात्री २.३० वाजता मंजूर  

उत्तम आरोग्य हेच लक्ष्मीबाई शिंदेंच्या दीर्घायुष्याचे रहस्य (Sangamner News)

लक्ष्मीबाई कारभारी शिंदे असं या आजीचं नावं. वयाची १०७ वर्ष उलटली तरी आजींची तब्येत अजूनही उत्तम आहे. चष्म्याशिवाय सुईत दोरा ओवून आजही लक्ष्मीबाई शिवणकाम करतात. विशेष म्हणजे त्यांची स्मरणशक्ती अजूनही चांगली असून नवीन पिढीला लाजवेल,असा त्यांचा आवाज आहे. उत्तम आरोग्यामुळे त्या कधीच दवाखान्याची पायरी चढल्या नाहीत. मेहनत करणे आणि नेहमी आनंदी राहणे हेच उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याचे रहस्य असल्याचे लक्ष्मीबाई सांगतात.  

अवश्य वाचा : राज्य सरकारची ‘आयुष्यमान भारत,मिशन महाराष्ट्र’ समिती स्थापन;डॉ.ओमप्रकाश शेटे अध्यक्षपदी 

लक्ष्मीबाई शिंदेंचा प्रवास नेमका कसा ? (Sangamner News)

वडगाव पान या गावातील लक्ष्मीबाई शिंदे या आजींच्या आयुष्याचा मोठा काळ हा निसर्गाच्या सान्निध्यात गेला आहे. शेतात काम करणं, सकस आणि घरगुती आहार घेणं, वेळेवर झोपणं आणि मन प्रसन्न ठेवणं या सवयींमुळेच त्या अजूनही तंदुरुस्त आहेत. लक्ष्मीबाईंचा आहार पूर्णपणे पारंपरिक आणि घरगुती आहे. पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेल्या सेंद्रिय अन्नपद्धतीवर त्यांचा भर आहे. स्वतःची कामे त्या स्वतः करतात.बाजारातलं तळलेले किंवा बाहेरचे अन्न खाणं त्या आजही टाळतात.घरातील हलकी कामे त्या अगदी आनंदाने करतात. त्याचबरोबर त्यांचा स्वभावही अत्यंत आनंदी आणि शांत आहे.कोणत्याही गोष्टीचा तणाव न घेता,”जे होईल ते चांगल्यासाठीच” या विचाराने त्या आयुष्य जगतात.

लक्ष्मीबाईंना नऊ मुली आणि तीन मुलं झाली होती. मात्र काही कारणास्तव सहा मुलं दगावली.या वयातही त्यांचे कुटुंब मोठे असून त्यांना नातवंडं आणि पतवंडं आहेत.गावातील लोक त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी येतात. जुन्या गोष्टी काढल्या तर त्या समोरच्या व्यक्तीला गप्पा मारण्यासाठी बसवून ठेवतात. संगमनेर तालुक्यात आजही त्यांच्या वयाची दुसरी व्यक्ती नाही. वडगाव पान गावातील या आजींची जीवनशैली पाहता, योग्य आहार, मेहनत आणि सकारात्मकता या गोष्टी दीर्घायुष्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत, हे स्पष्ट होते. लक्ष्मीबाईंचा हा प्रेरणादायी प्रवास पाहता तरुण पिढीने त्यांच्याकडून आयुष्य कास जगावं हे खरोखर शिकण्यासारखं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here