Sangamner News:मुलींच्या खांद्यावर पित्याचे पार्थिव;सात मुलींनी पार पाडले पित्याचे अंत्यसंस्कार

0
Sangamner News:मुलींच्या खांद्यावर पित्याचे पार्थिव;सात मुलींनी पार पाडले पित्याचे अंत्यसंस्कार
Sangamner News:मुलींच्या खांद्यावर पित्याचे पार्थिव;सात मुलींनी पार पाडले पित्याचे अंत्यसंस्कार

Sangamner News : असं म्हणलं जातं की वंशाला दिवा हवा,आई वडील वयोवृद्ध झाल्यानंतर त्यांच्या संगोपनाची सगळी जबाबदारी मुलगा पार पाडतो. मात्र, मुलगीही मुलांपेक्षा कुठेच कमी नाही याचाच प्रत्यय संगमनेर (Sangamner News) तालुक्याच्या पठार भागातील आंबीखालसा (Ambikhalsa) गावात पार पडलेला अंत्यविधीच्या निमित्ताने आला आहे. हा विषय सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. वडीलांचे निधन झाल्यानंतर पारंपरिक रूढींना छेद देत सातही मुलींनी आपल्या वडिलांचे अंत्यसंस्कार(Daughters performed their father’s funeral) करून समाजापुढे एक नवा आदर्श घालून दिला आहे.

नक्की वाचा : मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र कसे काढावे? अर्जाची प्रक्रिया कशी असेल?

नेमकं काय घडलं ? (Sangamner News)

संगमनेर तालुक्यातील चंदनापूरी गावातील ज्येष्ठ नागरिक बादशहा नाथा रहाणे यांचे शुक्रवारी ५ सप्टेंबरला निधन झाले. त्यांना मनीषा कान्होरे, ज्योती चासकर, स्वाती भोर, सोनाली भोर, प्राची शिंदे, भारती भालेराव, प्रिया भुसेकर या सात मुली असून त्यांना एकही मुलगा नाही. सर्व मुलींचे लग्न होऊन त्या सासरी नांदतात. रहाने हे वयोवृद्ध झाल्याने मुलगी मनीषा कान्होरे हिच्याकडे आंबीखालसा येथे ते राहत होते. मात्र अचानक आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र धक्याने त्यांचे निधन झाले. मुलगा नसल्याने अंत्यविधीची जबाबदारी कोण पार पाडणार,असा प्रश्न उपस्थित होत असतानाच या सातही मुलींनी आपल्या वडिलांच्या अंत्यविधीची जबाबदारी स्वतः स्वीकारली. वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराचे सर्व विधी सातही मुलींनी एकदिलाने पूर्ण केले. वडिलांच्या अंत्ययात्रेत सर्व मुली सहभागी झाल्या, त्यांनी पार्थिवाला खांदा दिला,सरावात मोठी मुलगी मनीषा हिने वडिलांना मुखाग्नी दिला.

अवश्य वाचा : श्रीलंका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये ‘ऊत’ चित्रपटाचा गौरव  

सात मुलींकडून वडिलांचे अंत्यसंस्कार  (Sangamner News)

“मुलगा नसेल तर अंत्यसंस्काराचे काय” ही जुनी चुकीची समजूत या सात मुलींनी आपल्या कृतीतून फोल ठरवली. १४ सप्टेंबरला वडिलांच्या दशक्रिया विधीनंतर आंबी खालसा येथील प्रभाकरराव भोर विद्यालय व चंदनापूरी येथील चंदनेश्वर विद्यालय या दोन विदयालयांना या सात मुलींनी बादशहा नाथा रहाणे यांच्या स्मरणार्थ देणगी देत दातृत्व व कर्तुत्वाच्या माध्यमातून वडीलांचे नाव अजरामर करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी संगमनेर तालुका वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष दत्तात्रय महाराज भोर यांची प्रवचन सेवा पार पडली. याप्रसंगी सरपंच, उपसरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.  तर विविध मान्यवरांनी बादशहा रहाणे यांचा जिवनपट उलगडत त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली.