Satyajeet Tambe:’संगमनेरचा निकाल धक्कादायक’-सत्यजित तांबे

0
Satyajeet Tambe:'संगमनेरचा निकाल धक्कादायक'-सत्यजित तांबे
Satyajeet Tambe:'संगमनेरचा निकाल धक्कादायक'-सत्यजित तांबे

नगर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीने २३६ तर महाविकास आघाडीला केवळ ४९ जागांवर यश मिळाले. विशेष बाब म्हणजे संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचा या निवडणुकीत धक्कादायक पराभव झाला. महायुतीचे उमेदवार अमोल खताळ (Amol Khatal) यांनी बाळासाहेब थोरात यांचा पराभव केला. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांचे भाचे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

नक्की वाचा : ‘आमचं आम्ही बघू’,मुख्यमंत्रिपदाबाबत अजित पवारांचं वक्तव्य 

ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केल असेल ते का केलं? (Satyajeet Tambe)

सत्यजित तांबे यावेळी म्हणाले की, संगमनेरचा निकाल धक्कादायक आहे. बाळासाहेब थोरात यांची सभागृहातली कमी निश्चितच सर्व नेत्यांना जाणवल्याशिवाय राहणार नाही.४० वर्ष बाळासाहेब थोरात यांनी सर्वांना सोबत घेऊन काम केलं. ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केल असेल ते का केलं असेल ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. तसेच संगमनेर विधानसभा मतदारसंघातील बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाचे आम्ही आत्मपरीक्षण करू,असे देखील सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे.

अवश्य वाचा :  राज्यात थंडीचा जोर वाढणार,हवामान विभागाचा अंदाज काय ?

धांदरफळमधून महायुतीला मताधिक्य (Satyajeet Tambe)

दरम्यान, संगमनेर विधानसभेत प्रचारादरम्यान काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याविषयी सुजय विखे पाटील यांच्या सभेत वसंतराव देशमुख यांनी  वादग्रस्त वक्तव्य केले होते. मात्र वसंतराव देशमुख यांनी बेताल वक्तव्य केलेल्या धांदरफळ गावातच महायुतीला मताधिक्य मिळाल्याचे दिसून आले आहे. धांदरफळ बुद्रुक व धांदरफळ खुर्द या दोन्ही गावातून अमोल खताळ यांना २९४५ तर बाळासाहेब थोरात यांना १८४७ मतं मिळाली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here