मुंबई : २०२२-२३ वर्षासाठीचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार (Sangeet Natak Akademi Award) जाहीर झाले आहेत. यामध्ये नुकतेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. नृत्य, नाटक,शास्त्रीय संगीत अशा विविध कलाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशभरातील कलाकारांना दरवर्षी संगीत नाटक अकादमी प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित केले जाते.
नक्की वाचा : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची मराठी भाषा गौरव दिवसाची पोस्ट चर्चेत
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका देवकी पंडित यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार (Ashok Saraf )
संगीत नाटक अकादमीच्या पुरस्कारांमध्ये २०२२ या वर्षासाठी शास्त्रीय संगीतातील अतुलनीय योगदानासाठी ज्येष्ठ शास्त्रीय गायिका देवकी पंडित यांना, तर २०२३ साठी ज्येष्ठ शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. नाट्य क्षेत्रातील कामगिरीसाठी अशोक सराफ यांना २०२२ या वर्षासाठीचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. तर २०२३ या वर्षाठीचा उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार अभिनेत्री ऋतुजा बागवे हिला जाहीर झाला आहे.
अवश्य वाचा : बापरे ! पंतप्रधान मोदींच्या सभेतील खुर्च्यांवर राहुल गांधींचे स्टिकर्स ?
पंडित कुमार गंधर्व यांची कन्या प्रसिध्द शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली यांनी वडिलांकडून गायनाचे धडे घेतले. तसेच आईकडूनही गायनाचे धडे त्यांनी घेतलेत. तर गानसरस्वती किशोरी आमोणकर, पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्यासारख्या दिग्गज गुरूंकडून संगीताचे धडे घेतलेल्या देवकी पंडित नंबियार या शास्त्रीय गायिका म्हणून प्रसिद्ध आहेत, शिवाय सुगम संगीतातही पार्श्वगायिका म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला आहे.
अशोक सराफ यांना मिळाली चतुरस्र अभिनयाची मिळाली पावती (Ashok Saraf )
मागील पन्नास वर्षे चतुरस्र अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची करमणूक करणाऱ्या अशोक सराफ यांना नुकतेच ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले. आता संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने हा आनंद द्विगुणित झाला आहे. महाराष्ट्र राज्य पुरस्कारांसह असंख्य पुरस्कार त्यांना त्यांच्या या कलाप्रवासात आधीच लाभले आहेत. आता राष्ट्रीय पातळीवरही त्यांच्या कला कारकिर्दीला पुरस्कार रूपाने दाद भेटत आहे. ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेल्या ऋतुजाने मालिका, चित्रपट, नाटक या तिन्ही माध्यमातून रसिकांचे रंजन केले आहे. अपघातात दोन्ही हात गमावलेल्या जिद्दी तरुणीची भूमिका तिने ‘अनन्या’ या नाटकात केली होती. या भूमिकेसाठी तिला बारा पुरस्कार मिळाले आहेत.