Sangharsh Yoddha: अंतरवाली सराटीत ‘संघर्षयोद्धा-मनोज जरांगे पाटील’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच

मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनपटाचा वेध "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील" या चित्रपटातून घेतला जाणार आहे.

0
Sangharsh Yoddha
Sangharsh Yoddha

नगर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांची जीवनकहाणी असलेला “संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील” (Sanghrshyoddha Manoj Jarange Patil) हा चित्रपट आता १४ जून २०२४ ला प्रदर्शित होत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते अंतरवाली सराटी येथे या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. चित्रपटाच्या धमाकेदार ट्रेलरमुळे प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्र या चित्रपटाच्या टीमने प्रमोशनसाठी पिंजून काढला आहे.  

नक्की वाचा : कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन सुटले; नीलेश लंके यांच्या पाठपुराव्यास यश

शिवाजी दोलताडे यांनी केले चित्रपटाचे दिग्दर्शन (Sangharsh Yoddha)

शिवाजी दोलताडे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी निभावलेली आहे. सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. तर अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे, किशोर चौगुले, सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे, श्रीकृष्ण शिंगणे यांच्या ही यामध्ये प्रमुख भूमिका आहेत.

अवश्य वाचा : ठरल्या मुहूर्ताच्या आधीच मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात १० जूनला आगमन

१४ जूनला चित्रपट होणार प्रदर्शित (Sangharsh Yoddha)

मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनपटाचा वेध “संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील” या चित्रपटातून घेतला जाणार आहे. एक मराठा कोट मराठा अशी साद अवघ्या महाराष्ट्राला या चित्रपटातून देण्यात आली आहे. लाठीचार्ज आणि गोळीबाराचा आदेश कोणी दिला ? हे देशाला समजलेच पाहिजे. मराठ्यांना आरक्षण तात्काळ जाहीर झालेच पाहिजे एवढच आम्हाला समजते, असे अनेक मुद्दे या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात आले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वासारखाच ट्रेलरही वादळी आहे. या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. एका सर्वसामान्य कार्यकर्त्याचा असामान्य प्रवास १४ जूनला मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here