Sangram Jagtap : अमृत भुयारी गटार योजनेमुळे सीना नदी स्वच्छ : संग्राम जगताप

Sangram Jagtap : अमृत भुयारी गटार योजनेमुळे सीना नदी स्वच्छ : संग्राम जगताप

0
Sangram Jagtap : अमृत भुयारी गटार योजनेमुळे सीना नदी स्वच्छ : संग्राम जगताप

Sangram Jagtap : नगर : शहराचा महत्वाकांक्षी असलेला अमृत भुयारी गटार योजना पंपिंग स्टेशन व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम मार्गी लागावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. आज प्रत्यक्षात हे काम पूर्णत्वाकडे जात आहे आणि लवकरच हा प्रकल्प सुरू होणार आहे. शहरातील सीना नदीमध्ये सोडलेले दूषित पाणी आता पाईपलाईनद्वारे थेट सांडपाणी प्रक्रिया केंद्रामध्ये घेऊन जाण्याचे काम केले जाणार आहे. आता सीना नदीचे रुंदीकरण, खोलीकरण व सुशोभीकरण काम करण्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे सीना नदी (Sina River) स्वच्छ, सुंदर म्हणून ओळखली जाईल. शहरातील एक-एक प्रकल्पाचे काम हाती घेऊन पूर्ण होत असल्याचा आनंद होत असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी केले.

Sangram Jagtap : अमृत भुयारी गटार योजनेमुळे सीना नदी स्वच्छ : संग्राम जगताप

नक्की वाचा: दिराने केली दोन भावजयींची कोयत्याने हत्या

आमदार जगताप व आयुक्त डांगे यांनी केली पाहणी

फुलसौंदर मळा येथील अमृत भुयारीगटार योजना व प्रकल्पाची आमदार संग्राम जगताप व आयुक्त यशवंत डांगे यांनी पाहणी केली यावेळी शहर अभियंता मनोज पारखे, इंजिनिअर श्रीकांत निंबाळकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता जय बिवाल आदी उपस्थित होते.

Sangram Jagtap : अमृत भुयारी गटार योजनेमुळे सीना नदी स्वच्छ : संग्राम जगताप

अवश्य वाचा: राहुरीत तनपुरे व कर्डिले यांच्यातच लढतीची शक्यता

आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की, (Sangram Jagtap)

नगर शहरातून ७ नाले वाहत आहेत. त्यात सोडलेले मैलामिश्रित सांडपाणी आता शहरातील ११० किलोमीटर अंतराची अंतर्गत भुयारी गटार योजनेद्वारे सीना नदीच्या उजव्या व डाव्या बाजूने १२०० एम एम व्यासाची बंदिस्त पाईपाद्वारेसुमारे १५ किलोमीटर वाहून नेत फुलसौंदर मळ्यातील पंपिंग स्टेशन जवळ सांडपाणी गोळा केले जाईल व या ठिकाणाहून अशुद्ध पाणी २१०० एचपी पावरच्या ७ पंपाद्वारे वाकोडी शिवारातील ५७ एम एल टी च्या प्लांटमध्ये घेऊन जात त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. बीओडी १० पेक्षा कमी करून हे शुद्ध पाणी शेतकऱ्यांना वापरासाठी उद्यानासाठी केले जाणार आहे, या माध्यमातून सीना नदीच्या संवर्धनासाठी उचललेले एक महत्त्वाचे पाऊल असून या प्रकल्पाची यशस्वी चाचणी दसऱ्याच्या दरम्यान करण्यात येणार आहे, तसेच केंद्र व राज्य सरकारचे पीएमओ व सीएमओ ऑफिसच्या संपर्कात राहून लोकार्पण सोहळा उत्साहात होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Sangram Jagtap : अमृत भुयारी गटार योजनेमुळे सीना नदी स्वच्छ : संग्राम जगताप