Sangram Jagtap : धार्मिक स्थळांच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध : संग्राम जगताप

Sangram Jagtap : धार्मिक स्थळांच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध : संग्राम जगताप

0
Sangram Jagtap : धार्मिक स्थळांच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध : संग्राम जगताप
Sangram Jagtap : धार्मिक स्थळांच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध : संग्राम जगताप

Sangram Jagtap : नगर : शहराच्या विकास कामांबरोबरच धार्मिक स्थळांचा विकास व्हावा यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. आनंदऋषीजी महाराज (Anand Rishiji Maharaj) यांचे समाधी स्थळ आपल्या शहरात असून देशभरातून भाविक भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे समाधीस्थळ परिसराचा विकास व्हावा यासाठी राज्य सरकारच्या (State Govt) माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे या परिसराला सुशोभीकरणाचे रूप प्राप्त झाले आहे, केडगाव येथील जैन स्थानक परिसराचा विकास व्हावा त्यासाठी मोठे निधी उपलब्ध करून दिला आहे, केडगाव उपनगराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी माझे प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी केले.

Sangram Jagtap : धार्मिक स्थळांच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध : संग्राम जगताप
Sangram Jagtap : धार्मिक स्थळांच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध : संग्राम जगताप

नक्की वाचा: मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही नाक्यांवर टोलमाफी,राज्य सरकारचा मोठा निर्णय

सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन

केडगाव येथील जैन धर्म स्थानक परिसरातील सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी नगरसेवक विपुल शेटिया, केडगाव जैन श्रावक संघाचे अध्यक्ष पन्नालाल बोकरिया, राजेंद्र मुनोत, बाबूलाल चोरडिया, संजय संचेती, सोहन बरमेचा, कमलेश गुंदेचा, संतोष शेटिया, धीरज चोरडिया, मुकेश बरमेचा आदी उपस्थित होते.

Sangram Jagtap : धार्मिक स्थळांच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध : संग्राम जगताप
Sangram Jagtap : धार्मिक स्थळांच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध : संग्राम जगताप

अवश्य वाचा: विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर,देवेंद्र फडणवीस यांची एका शब्दात प्रतिक्रिया

पन्नालाल बोकरिया म्हणाले की, (Sangram Jagtap)

केडगाव उपनगरामध्ये जैन बांधव मोठ्या संख्येने राहत आहेत. त्यांना धार्मिक कार्यक्रमासाठी जैन स्थानकाची निर्मिती केली. या परिसराचे सुशोभीकरणाचे काम मार्गी लागावे यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे पाठपुरावा केला आणि त्यांनी तातडीने निधी उपलब्ध करून दिला असल्यामुळे जैन स्थानक परिसराला सौंदर्यकरणाचे रूप प्राप्त होईल, असे त्यांनी सांगितले.