Sangram Jagtap : नगर : शहरामध्ये (City) सुरक्षित आणि विकासाचे वातावरण निर्माण झाले असल्यामुळे मोठ-मोठे प्रकल्प व नावाजलेले ब्रँड नगरमध्ये येत आहे. विडी कामगार यांनी वारुळाचा मारुती येथे 1980 साली जागा विकत घेऊन ठेवली होती आता त्यांना गृह प्रकल्प उभे करायचे असून या ठिकाणी लाईट, पाणी, ड्रेनेज, रस्ते आदि मूलभूत सुविधा देणे गरजेचे आहे. यासाठी शासनाकडून (Government) सुमारे 60 लाख रुपयांचा निधी सोसायटी अंतर्गातील विविध विकास कामासाठी उपलब्ध करून दिला आहे. शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत विकासाची कामे घेऊन जाण्यासाठी यशस्वी झालो आहेत विकासाच्या योजनांमुळे शहराचे विस्तारीकरणही झपाट्याने होत असून महाराष्ट्रातील शहरांमध्ये नगरचे देखील विकसित शहर म्हणून नाव घेतले जाईल असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी केले.
नक्की वाचा: मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही नाक्यांवर टोलमाफी,राज्य सरकारचा मोठा निर्णय
विडी कामगार सोसायटीतील अंतर्गत विकास कामाचे भूमिपूजन
वारुळाचा मारुती येथील विडी कामगार गृहनिर्माण सोसायटीतील अंतर्गत विविध विकास कामाचे भूमिपूजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी माजी नगरसेवक धनंजय जाधव, प्रा.अरविंद शिंदे, नाना मदास, दत्तात्रेय आडीगोपुळ, प्रदीप पतके, नारायण चिल्का, कोडम पंतेलु, दादा पांडुळे, संतोष लांडे, मनीष फुलडाळे, ज्ञानेश्वर मंगलाराम, सुरेखा अडेमप, मनोहर श्रीपंत, दत्ता पंतेलु आदीस नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अवश्य वाचा: विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर,देवेंद्र फडणवीस यांची एका शब्दात प्रतिक्रिया
धनंजय जाधव म्हणाले की (Sangram Jagtap)
विकास कामांचे आश्वासने पूर्ण करणारे नेतृत्व आपल्या शहराला मिळाले आहेत विडी कामगारांचे प्रश्न प्राधान्य क्रमाने सोडविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला असून याचबरोबर नागरिकांच्या सुखदुःखात सामील होऊन त्यांचे प्रश्न समजवून घेऊन सोडविण्याचे काम ते करत आहे. कोरोना संकटकाळामध्ये त्यांनी शेवटच्या घटकापर्यंत आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे संकट काळात फोन करेल त्याच्या मदतीला धावून जाण्याचे काम आमदार संग्राम जगताप नेहमीच करत असतात असे ते म्हणाले.