Sangram Jagtap : नगर शहर भविष्यकाळात मेट्रोसिटीकडे वाटचाल करेल : संग्राम जगताप

0
Sangram Jagtap : नगर शहर भविष्यकाळात मेट्रोसिटीकडे वाटचाल करेल : संग्राम जगताप
Sangram Jagtap : नगर शहर भविष्यकाळात मेट्रोसिटीकडे वाटचाल करेल : संग्राम जगताप

Sangram Jagtap : नगर : नगर शहरात (Nagar City) मागील १० वर्षात मूलभूत प्रश्नांपासून विकासाची कामे मार्गी लावली आहे. खड्डे मुक्त शहराची संकल्पना राबवून नियोजनबद्ध व कायमस्वरूपीची रस्ता कॉंक्रीटकरण्याची कामे सुरू आहे. सर्वांच्या सहकार्यातून चांगले काम उभे राहत आहे. आता योग्य दिशा मिळाल्या असून आपले नगर शहर भविष्यकाळात मेट्रोसिटीकडे (Metro City) वाटचाल करेल, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी केले.

नक्की वाचा: मोठी बातमी!शंकरराव गडाख यांच्या साखर कारखान्याला आयकर खात्याची नोटीस

नागरिकांशी आमदार संग्राम जगताप यांनी साधला संवाद

नगर शहरातील सथ्था कॉलनीतील नागरिकांशी आमदार संग्राम जगताप यांनी संवाद साधला. यावेळी उद्योजक राजेंद्र चोपडा, माजी नगरसेवक संजय चोपडा, प्रकाश भागानगरे, अण्णासाहेब मुनोत,अरविंद गुंदेचा, संदीप गांधी, आदेश चंगेडिया, शरद मुनोत, सुधीर चोपडा, नरेंद्र लोढा, राजेंद्र बलदोटा, विजय गुगळे, दिलीप गुंदेचा, किरण शिंगवी, अतुल मुनोत, प्रकाश गांधी, राजेंद्र गांधी आदी उपस्थित होते.

अवश्य वाचा: ‘घड्याळ’ चिन्हाबाबत उद्या सुनावणी; अजित पवार गटाला कोणते चिन्ह मिळणार?

उद्योजक राजेंद्र चोपडा म्हणाले की, (Sangram Jagtap)

शहराला सुसंस्कृत आणि प्रामाणिक नेतृत्व मिळाले आहे. सर्वांना बरोबर घेऊन शहर विकासाचे काम करत आहे. आमदार संग्राम जगताप यांनी राबविलेल्या विकासकामाची दखल नगरकर नक्कीच घेतील. कारण कधीही न झालेली विकासाची कामे पूर्णत्वाकडे जाताना दिसत आहे. जैन समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेत असतात आणि मार्गी देखील लावतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन संत महंतांच्या विचारांची प्रेरणा घेत असतात, असे त्यांनी सांगितले.

 
वकील प्रमोद मेहेर म्हणाले की, सध्या राजकारणाचा बट्ट्याबोळ झाला आहे. एकमेकांवर खालच्या पातळीवर आरोप केले जाते मात्र, आपल्या शहराचे लोकप्रतिनिधी विकास कामांचे व्हिजन ठेवून काम करत आहे. त्यांच्या कुटुंबाला मिळालेला वारसा पुढे घेऊन जात आहे. आपल्या शहराबद्दल असलेली आत्मियता पाहून असे वाटते की, शहराचा भविष्यकाळ उज्वल आहे, असे त्यांनी सांंगितले.