Sangram Jagtap : आमदार जगताप यांच्यामुळे नगरच्या क्रीडा क्षेत्राला मोठी चालना : घुले

Sangram Jagtap : आमदार जगताप यांच्यामुळे नगरच्या क्रीडा क्षेत्राला मोठी चालना : घुले

0
Sangram Jagtap : आमदार जगताप यांच्यामुळे नगरच्या क्रीडा क्षेत्राला मोठी चालना : घुले
Sangram Jagtap : आमदार जगताप यांच्यामुळे नगरच्या क्रीडा क्षेत्राला मोठी चालना : घुले

Sangram Jagtap : नगर : जिल्ह्यातील पहिले भव्य स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे (Sports Complex) काम प्रगतीपथावर आहे. यासाठी सरकारकडून तब्बल २१ कोटी तसेच ऐतिहासिक वाडियापार्क मैदानाच्या नूतनीकरणासाठीही ५१ कोटी रुपयांचा असा एकूण ७२ कोटींचा निधी राज्य सरकारकडून (State Govt) आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी मंजूर करून आणला आहे. या कामांमुळे नगरच्या क्रीडा क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. यामुळे नवनवीन खेळाडू नगर मधून निर्माण होतील. भविष्यात नगरच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार जगताप यांची हॅट्रिक होणे आवश्यक आहे. यासाठी सहकार क्रीडा मंडळाच्या सर्व सदस्यांनी आमदार जगताप यांना पाठिंबा दिला असल्याचे हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले सांगितले.

नक्की वाचा: शिर्डी प्रमाणेच संगमनेरचा विकास आपल्याला करायचा आहे : विखे पाटील

महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना पाठिंबा

शहरातील सहकार क्रीडा मंडळ या जुन्या क्रीडा संस्थेच्या वतीने महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना पाठिंबा देण्यात आला. यावेळी ते बोलत होते. क्रीडा भारतीचे अध्यक्ष सुधीर चपळगावकर, ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक अजय पवार, राजू निंबाळकर, राजेंद्र धिरडे, संजय क्षीरसागर, राजेश सबलोक, राजेंद्र कुदळे, बाबा जाधव आदी खेळाडू उपस्थित होते.

Sangram Jagtap : आमदार जगताप यांच्यामुळे नगरच्या क्रीडा क्षेत्राला मोठी चालना : घुले
Sangram Jagtap : आमदार जगताप यांच्यामुळे नगरच्या क्रीडा क्षेत्राला मोठी चालना : घुले

अवश्य वाचा: श्रीगोंद्यातील साखर कारखानदारांच्या सत्तासंघर्षात कोण मारणार बाजी?

आमदार संग्राम जगताप म्हणाले, (Sangram Jagtap)

अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी नगरचे नावलौकिक देशात उंचावले आहे. यामध्ये सहकार क्रीडा मंडळाचे मोठे योगदान आहे. येणाऱ्या काळात अजून चांगले खेळाडू निर्माण व्हावेत तसेच भावी पिढीला शहरात चांगले मैदाने उपलब्ध व्हावेत यासाठी अद्यावत व सर्व सोयी सुविधांयुक्त असे भव्य स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नगरमध्ये उभारले जात आहे. नगरच्या ऐतिहासिक वाडियापार्क मैदानाच्या विकासासाठीही ५१ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्याने खेळाडूंना या ऐतिहासिक मैदानवर लवकरच अद्यावत व चांगल्या सुविधा मिळणार आहेत. नगरचा क्रीडा क्षेत्राचा वारसा सहकार क्रीडा मंडळ उत्तम प्रकारे जपत असून खेळाडूंना प्रोत्साहन देत घडवत आहे.