Sangram Jagtap : नगरच्या रस्त्यांसाठी १५० कोटीचा निधी मंजूर : संग्राम जगताप

Sangram Jagtap : नगरच्या रस्त्यांसाठी १५० कोटीचा निधी मंजूर : संग्राम जगताप

0
Sangram Jagtap

Sangram Jagtap : नगर : नगर महापालिकेने विकास आराखड्यातील (डीपी) रस्त्यांच्या विकास कामांसाठी पाठवलेल्या प्रस्तावातील कामांना राज्य शासनाच्या (State Govt) नगरविकास खात्याने शहरातील डीपी रस्त्याच्या प्रकल्पाच्या फेज १ ला मान्यता दिली आहे. पहिल्या टप्प्यातील १५० कोटीच्या कामांना मंजुरी दिली. आठ दिवसांत या कामांची निविदा प्रक्रिया सुरु होणार आहे. महाराष्ट्र सुवर्णज्योत नगरोत्थान योजनेतून नगर महापालिकेला (AMC) प्रथमच डीपी रस्त्यांच्या कामासाठी इतका मोठा निधी मिळाला आहे. राज्य सरकारने नगर शहराच्या विकासाच्या दृष्टीने मोठी भेट दिली आहे. नगर शहरातील डीपी रस्ते प्रशस्त आणि मजबूत होणार असल्याने विकासाला चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी दिली.

हे देखील वाचा: मनोज जरांगेंचं आमरण उपोषण स्थगित; पुन्हा राज्यभरात फिरुन रान उठवणार

शहरात टप्य्याटप्प्याने रस्त्याची कामे मार्गी लागणार (Sangram Jagtap)

आमदार संग्राम बोलताना पुढे म्हणाले की, यापूर्वी नगर शहरातील कोठी रोड, बालिकाश्रम रोड, टिळक रोड, स्वस्तिकचौक ते आनंदऋषीजी महाराज समाधीस्थळ रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शहराचे ग्रामदैवत विशाल गणपती मंदिर मिरवणूक मार्ग रस्ता, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, केडगाव देवी रस्ता, केडगाव लिंक रोड, पुणे महामार्ग ते कल्याण महामार्गापर्यंत, केडगाव अर्चना हॉटेल ते नेप्ती बाजार समिती रस्ता, महेश टॉकीज रस्ता, तारकपूर ते राधाबाई काळे महिला कॉलेज, सराफ बाजार रस्त्यांची कामे पूर्ण झाली. शहरात टप्य्याटप्प्याने डीपी रस्त्याची कामे मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हे देखील वाचा: मराठा आंदोलनामुळे संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद

डीपी रस्त्यांसाठी महापालिकेने प्रस्ताव पाठवला (Sangram Jagtap)

आमदार संग्राम जगताप यांच्या निर्देशानुसार महापालिका हद्दीतील डीपी रस्त्यांसाठी महापालिकेने प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाच्या अनुषंगाने आमदार जगताप यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला. नगर शहरातील डीपी रस्ते प्राधान्यक्रमाने होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने त्यांनी मंत्रालय पातळीवर कायम संपर्कात राहून हा निधी मंजूर करून आणला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here