Sangram Jagtap : नगर : सिव्हिल हडको परिसरातील विकासाची कामे मार्गी लागावीत यासाठी आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी शासनाच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे अंतर्गत रस्ता कॉंक्रिटी करण्याची कामे सुरू आहेत गणेश चौक ते मिस्कीन मळा रोड हा अत्यंत खराब झाला होता. त्याचे काम सुरू असून लवकरच नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. नागरिकांकडून ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. माता भगिनी औक्षण करून आशीर्वाद देत आहेत. सिव्हिल हडको परिसरातील नागरिक विकास कामांच्या पाठीमागे उभे राहून आमदार संग्राम जगताप यांना मतरूपी आशीर्वाद देणार आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप (Sachin Jagtap) यांनी सिव्हिल हडको गणेश चौक परिसरातील नागरिकांशी विकास यात्रेच्या माध्यमातून संवाद साधला असल्याचे प्रतिपादन माजी नगरसेवक सतीश बारस्कर (Satish Barskar) यांनी केले.
नक्की वाचा: लाल संविधान दाखवून तुम्ही कोणाला इशारा देताय? – देवेंद्र फडणवीस
सचिन जगताप यांनी नागरिकांशी संवाद साधला
नगर शहर विधानसभा निवडणूक महायुती चे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ सिव्हिल हडको येथे विकास यात्रेच्या माध्यमातून माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांनी नागरिकांशी संवाद साधला.
अवश्य वाचा: ‘बारामतीच्या विकासात माझा खारीचा वाटा’-अजित पवार
नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित (Sangram Jagtap)
यावेळी माजी नगरसेवक सतीश बारस्कर, गजेंद्र भांडवलकर, शिवाजी डोके, काका शेळके, आनंद लहामगे, दिलीप कटारिया, विशाल म्हस्के, रोहन धिप्पाड, अजय रंगलाणी, किरण पिसोरे, अरुण खरात, प्रमोद पगारे, अनिरुद्ध भोर, सचिन जगताप, संकेत पुजारी, जय दिघे, यश कांडेकर, किरण बारस्कर, नमन महांकले, प्रशांत पगारे, शुभम भोसले, विजय काकडे, पराग महांकाळ, अजय भोसले, अभि भांडवलकर, विजय ठोंबरे आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.