Sangram Jagtap : नगर : राज्यातील महायुती सरकारने (MahaYuti) गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात महिलांना केंद्रस्थानी ठेवत भरपूर योजना सुरु केला आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारख्या अनेक योजना या महिलांना आधार देणाऱ्या आहेत. नगरमध्ये आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्या माध्यमातून या सर्व योजनांचा लाभ शहरातील महिलांना मिळत आहे. नगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार संग्राम जगताप हे कायम प्रयत्नशील आहेत, असे प्रतिपादन माजी नगरसेविका शीतल जगताप यांनी केले.
अवश्य वाचा: ५० लाखांच्या बिअर बाटल्यासहा ७२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
राज्य सरकारच्या महिलांसाठीच्या योजनांची माहिती
महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका शीतल जगताप याही प्रचाराच्या रणधुमाळीत उतरल्या आहेत. शीतल जगताप या शहर व उपनगरमधील विविध वसाहतींमध्ये महिलांच्या गाठीभेटी घेत आहेत. या प्रसंगी त्या बोलत होत्या. आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या विकासकांची सविस्तर माहिती, तसेच राज्य सरकारच्या महिलांसाठीच्या योजनांची माहिती शीतल जगताप महिलांना देत आहेत. सर्व ठिकाणी त्यांच्या या छोट्या बैठकांना महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
शीतल जगताप म्हणाल्या, (Sangram Jagtap)
आज नगर शहरातील सर्वच भागांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या निधीतून विकास कामे झाली आहेत. या माध्यमातून नागरिकांचे प्रलंबित प्रश्न व समस्या सुटल्याने आमदार संग्राम जगताप यांचे शहरातील नागरिकांशी ऋणानुबंध जुळत अतुट नाते निर्माण झाले आहे. त्यामुळे त्यांना या विधानसभा निवडणुकीत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.