Sangram Jagtap : नगर : नगर शहर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्या प्रचारासाठी सावेडी उपनगरात भाजप (BJP), शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नागरिकांशी विकासयात्रेच्या माध्यमातून संवाद साधला.
नक्की वाचा: नगर शहराच्या विकासासाठी आमदार जगताप कायम प्रयत्नशील : शीतल जगताप
पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या विकासयात्रेत भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, ज्येष्ठ नेते सुनील रामदासी, माजी सभापती कुमार वाकळे, भाजपच्या महिला शहर जिल्हाध्यक्ष प्रिया जानवे, माजी नगरसेविका आशा कराळे, वंदना ताठे, सचिन पारखे, आकाश दंडवते, प्रशांत मुथा, बाळासाहेब वाकळे, दगडू पवार, बाळासाहेब भुजबळ आदी उपस्थित होते.
अवश्य वाचा: संजय राऊतांची राहुल जगतापांवर जोरदार टीका; पाचपुतेंचाही घेतला समाचार
अभय आगरकर म्हणाले की, (Sangram Jagtap)
संग्राम जगताप यांनी शासनाच्या माध्यमातून विकासकामांची गंगाच आणली आहे. याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी देखील शहर विकासासाठी मोठ्या निधी उपलब्ध करून दिला. महायुती सरकारने राज्यात विकास कामांचा डोंगर उभा केला आहे. महायुतीचे सरकार येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
बाबासाहेब वाकळे म्हणाले की, नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांचा विजय निश्चित झाला आहे. भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रचाराला लागले आहेत. घरोघरी जाऊन महायुतीने केलेल्या विकासकामाची माहिती दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.