Sangram Jagtap : शहरात मोठे शक्तिप्रदर्शन करून महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ

Sangram Jagtap : शहरात मोठे शक्तिप्रदर्शन करून महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ

0
Sangram Jagtap : शहरात मोठे शक्तिप्रदर्शन करून महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ
Sangram Jagtap : शहरात मोठे शक्तिप्रदर्शन करून महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ

Sangram Jagtap : नगर : अहमदनगर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी आज (ता. ११) शहरात मोठे शक्तिप्रदर्शन करत प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) अजित पवार गट, भाजप (BJP)शिवसेनेच्या (Shiv Sena) शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sangram Jagtap : शहरात मोठे शक्तिप्रदर्शन करून महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ
Sangram Jagtap : शहरात मोठे शक्तिप्रदर्शन करून महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ

नक्की वाचा: श्रीगोंद्यातील साखर कारखानदारांच्या सत्तासंघर्षात कोण मारणार बाजी?

नारळ फोडून प्रचाराचा प्रारंभ

महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचाराचा प्रारंभ शनिवारी सकाळी शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात विधिवत पूजा करून करण्यात आला.माजी आमदार अरुण जगताप, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, आरपीआयचे शहराध्यक्ष किरण दाभाडे, भाजपचे शहर विधानसभा प्रमुख महेंद्र गंधे आदींसह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला.

Sangram Jagtap : शहरात मोठे शक्तिप्रदर्शन करून महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ
Sangram Jagtap : शहरात मोठे शक्तिप्रदर्शन करून महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ

अवश्य वाचा : ‘जातीयवादाकडे निवडणूक नेण्यासाठीच योगींना महाराष्ट्रात आणले जातय’- शरद पवार

आमदार संग्राम जगताप म्हणाले (Sangram Jagtap)

विधानसभा निवडणुकीसाठी शहरात प्रचार करताना सर्वच भागांमध्ये मला नगरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ठिकठिकाणी होणाऱ्या उत्स्फूर्त स्वागताने मी भारावून जात आहे. मागील १० वर्षात केलेले विकासकामे नागरिकांपर्यंत घेऊन जात आहे. नागरिकांना अपेक्षित असलेले विकास कामे होत असल्याने नागरिकांमधून मोठे समाधान व्यक्त केले जात आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कडून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरु आहेत. भविष्यात या विकासकांमुळे शहराची वेगळी ओळख निर्माण होणार आहे. हा शहर विकासाचा वेग अजून वाढवण्यासाठी नगरकरांनी मला पुन्हा मतांचा आशीर्वाद द्यावा. मतांचे हे ऋण शहराच्या सर्वांगीण विकासाने मी फेडणार आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.  

Sangram Jagtap : शहरात मोठे शक्तिप्रदर्शन करून महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ
Sangram Jagtap : शहरात मोठे शक्तिप्रदर्शन करून महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ

प्रचाराला प्रारंभ होण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आदी महापुरुषांच्या पुतळ्यांना आमदार संग्राम जगताप यांनी अभिवादन केले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मोठे शक्ती प्रदर्शन करत प्रचार फेरी काढण्यात आली .  यावेळी ठिकठिकाणी मोठे पुष्पहार व जेसीबीतून पुष्पृष्टी करून व फटाक्यांची आतषबाजी करून’ प्रचारफेरीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. नागरिकांना अभिवादन करत संग्राम जगताप प्रचार फेरीत चालत होते. यावेळी माळीवाडा परिसरात यावेळी मोठी गर्दी झाली होती.

Sangram Jagtap : शहरात मोठे शक्तिप्रदर्शन करून महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ
Sangram Jagtap : शहरात मोठे शक्तिप्रदर्शन करून महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ