Sangram Jagtap | मी केलेल्या विकास कामावर नागरिकांचा विश्वास – संग्राम जगताप

0
Sangram Jagtap
Sangram Jagtap

Sangram Jagtap | नगर : नालेगाव ग्रामस्थ माझ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वजण गटतट विसरून एकत्र येत मला पाठिंबा दिला. मी केलेल्या विकास कामावर विश्वास ठेवला माझ्या पाठीवर शाब्बासकीची थाप देत मोठ्या उत्साहात माझे स्वागत केले त्यामुळे माझे मन भारावून गेले, यामुळे मला ऊर्जा मिळाली असून मी अधिक जोमाने शहर विकासासाठी काम करील, अशी भावना आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी व्यक्त केली.

नक्की वाचा: श्रीगोंद्यातील साखर कारखानदारांच्या सत्तासंघर्षात कोण मारणार बाजी?

गणेश कवडेंचा पाठिंबा (Sangram Jagtap)

अहिल्यानगर विधानसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी प्रभाग क्रमांक १३ मधून प्रचारार्थ विकास यात्रा काढत नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नालेगाव ग्रामस्थ आमदार संग्राम जगताप यांच्या स्वागतासाठी एकवटले होते. ठिकठिकाणी दारासमोर रांगोळी काढण्यात आल्या होत्या.  शिवसेना उबाठा गटाचे माजी नगरसेवक गणेश कवडे यांनी विकासाच्या मुद्द्यावर आमदार संग्राम जगताप यांना पाठिंबा दिला

अवश्य वाचा : ‘जातीयवादाकडे निवडणूक नेण्यासाठीच योगींना महाराष्ट्रात आणले जातय’- शरद पवार

यांची उपस्थिती (Sangram Jagtap)

यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, दीपक सूळ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, स्थायी समितीचे माजी सभापती किशोर डागवले, संभाजी लोंढे, दत्तात्रय मुदगल, अजय चितळे, नरेंद्र कुलकर्णी, महेश लोंढे, मयूर बोचुघोळ, रवी दंडी, कैलास दळवी आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here