Sangram Jagtap | नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील बऱ्याच भाग हा वर्षानुवर्षे पाण्यापासून वंचित होता. नागरिकांचे बरेच हाल होत होते. अशा परिस्थितीतून या भागाला बाहेर काढण्यासाठी आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी विशेष लक्ष घालून प्रयत्न केले. त्यास यश आले असून आता नियमित व मुबलक पाणीपुरवठा या भागाला होत आहे. तसेच याभागामधील अंतर्गत सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाल्याने रस्त्यांचाही प्रश्न सुटला आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मागील १० वर्षांपासून आमदार जगताप यांनी सोडवले आहेत. त्यामुळे जनता त्यांच्या मागे ठामपणे उभे आहे, असे प्रतिपादन माजी नगरसेवक अविनाश घुले यांनी केले.
अवश्य वाचा – आता मुख्यमंत्र्यांनी सांगितले तरी माघार नाही; भाऊसाहेब कांबळे यांचा पत्रकार परिषदेत निर्धार
जल्लोषात स्वागत (Sangram Jagtap)
अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचाराची नगर विकास यात्रचे प्रभाग ११मध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. या प्रसंगी माजी नगरसेवक अविनाश घुले यांनी प्रतिक्रिया दिल्या. यावेळी माजी नगरसेवक नज्जू पैलवान, रूपसिंग कदम, संजय चोपडा व प्रकाश भागानगरे, माजी उपमहापौर गणेश भोसले, विपुल शेटिया, मुजाहिद कुरेशी, विनोद कदम, कमलेश भंडारी, संतोष तोडकर, राजू बंग, निलेश भंडारी, गोपाल वर्मा आदी उपस्थित होते.
हेही वाचा – संग्राम जगताप यांना नगर शहरातून माझ्यापेक्षा अधिक लीड देवून विजयी करा : डॉ.सुजय विखे पाटील
ठाकरे गटाचे विजय जाधवांचा राष्ट्रवादीत प्रवेश (Sangram Jagtap)
मागील ३५ वर्षांपासून शिवसेनेमध्ये कार्यरत असलेले शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख विजय जाधव यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षात प्रवेश केला. आमदार जगताप यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी या भागाचे मूलभूत प्रश्न सोडवून चांगल्या सुविधा दिल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या कामावर या परिसरातील नागरिक समाधानी आहेत. आमदार जगताप यांच्या विकासकामंनी प्रभावित होऊन या भगातून जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला असल्याचे जाधव यांनी सांगितले.