Sangram Jagtap : नगर : माझे सरकार दरबारी भरपूर वजन आहे. या वजनाचा उपयोग काही फालतू गोष्टींसाठी न करता सरकारकडून मोठा विकासनिधी मंजूर करून आणण्याला प्राधान्य देण्यासाठी केला आहे. ‘मेरेपास भगवान का दिया सबकुछ है…’ त्यामुळे सेवावृत्तीने फक्त आणि फक्त आपल्या मातृभूमीसाठीच पूर्णवेळ काम करण्याची माझी भूमिका आहे. राज्याच्या नकाश्यावर विकसित नगर शहर (Nagar City) म्हुणुन वेगळी ओळख निर्माण करून भविष्यात आपले शहर हे मेट्रोसिटी करायचे आहे. यासाठी सर्वांची साथ मला हवी आहे. अहिल्यानगर (Ahilyanagar) मधील तब्बल ५३ व्यापारी संघटनांनी माल पाठींबा दिल्याबद्दल मी सर्वंच्या ऋणात राहील, असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी केले.
नक्की वाचा : जिल्ह्यात १५ नोव्हेंबरपासून अवकाळीची शक्यता!
विविध व्यापारी संघटनांचा जगताप यांना पाठिंबा जाहीर
अहिल्यानगर शहरातील ५०हून अधिक विविध व्यापाऱ्यांच्या संघटनांनी महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यानिमित्त मंगळवारी सायंकाळी व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व संघटनांचे पदाधिकारी, व्यापारी, उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार अरुण जगताप, उमेदवार संग्राम जगताप, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, संतोष बोथरा, डाळ मंडई आडते बाजार मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक गांधी, सराफ संघटनेचे अध्यक्ष सुभाष कायगावकर, इंडस्ट्रियल इस्टेटचे अध्यक्ष अरविंद गुंदेचा, जॉग्री असोसिएशनचे अध्यक्ष राजू बोथरा, मिरची मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गोपाळ मणियार, आदर्श व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय चोपडा, क्रीडाईचे अध्यक्ष अमित मुथा, भाजी फळ फूल व्यापारी असोसिएशनचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक लाटे, उद्योजक व रामकृष्ण क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष श्रीगोपाल धूत, हॉटेल व्यवसायिक संघटनेचे अध्यक्ष प्रदीप पंजाबी आदी उपस्थित होते.
अवश्य वाचा : विकासकामे न करता विरोधकांचे वेगळ्याच विषयावर राजकारण : मोनिका राजळे
आमदार जगताप पुढे म्हणाले, (Sangram Jagtap)
नगर शहर बदलत असल्यानेच शहरीकरणाला व्यापारी, उद्योग क्षेत्राल चालना देण्यासाठी गेल्या १० वर्षांपासून शहर विकासाचे नियोजन करत आहे. औद्योगिक क्षेत्र वाढून रोजगार वाढवा यासाठी विळदमध्ये ६०० एकर क्षेत्रात नव्या एमआयडीसीसाठी जागा मंजूर झाली आहे. हे नगर विकासाचे महत्वाचे पाउल आपण टाकत आहोत. पुढील १५ ते २० वर्षाचा विचार करून शहरातील सर्व डीपी रस्त्यांचे दर्जेदार कामे सुरु आहेत, असे त्यांनी सांगितले.
नरेंद्र फिरोदिया म्हणाले, आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या कामांमुळे शहराचा विकासाचा वेग वाढला आहे. कोरोना संकट काळातही आमदार जगताप यांनी केलेले मदत कार्य अतुलनीय आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी जयद्रथ खाकाळ यांनी आमदार जगताप यांनी एमआयडीसी मध्ये दिलेल्या सुविधांची माहिती दिली. संतोष बोथरा यांनीही मनोगत व्यक्त केले. कमलेश भंडारी यांनी बैठकीचे सूत्रसंचालन केले. संतोष बोथरा यांनी स्वागत केले. विपुल शेटिया यांनी आभार मानले.