Sangram Jagtap : भूमिगत गटार व काँक्रिटीकरण रस्त्याचा ५० वर्षांपूर्वीचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार; आमदार संग्राम जगताप यांची ग्वाही

0

Sangram Jagtap : नगर : राज्य सरकारकडे (State Govt) पाठपुरावा करून शहरातील खराब रस्त्यांची कामे मार्गी लागावी यासाठी सुमारे १५० कोटी रुपयांचा निधी (Funding) मंजूर केला आहे. ती कामे आता सुरु होणार आहे. ५० वर्षांपासून प्रलंबित असलेला मध्यवर्ती शहरातील जिल्हा वाचनालय ते गांधी मैदान, पटवर्धन चौक ते गाडगीळ पटांगण नालेगाव पर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण व भूमिगत गटारीचे काम मार्गी लागणार आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी केले.

Sangram Jagtap : भूमिगत गटार व काँक्रिटीकरण रस्त्याचा ५० वर्षांपूर्वीचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार; आमदार संग्राम जगताप यांची ग्वाही
Sangram Jagtap : भूमिगत गटार व काँक्रिटीकरण रस्त्याचा ५० वर्षांपूर्वीचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार; आमदार संग्राम जगताप यांची ग्वाही

अवश्य वाचा : अन्यथा पुढील अंत्यविधी कर्जत तहसील कार्यालयासमोर

आमदार जगताप यांनी केली कामाची पाहणी

मध्यवर्ती शहरातील जिल्हा वाचनालय ते गांधी मैदान, पटवर्धन चौक ते गाडगीळ पटांगण नालेगाव पर्यंत होणाऱ्या भूमिगत गटार व रस्ता काँक्रिटीकरण कामाची आमदार संग्राम जगताप यांनी पाहणी केली यावेळी विकी वाघ, प्रा.अरविंद शिंदे, रवी दंडी, सारंग पंधाडे, सुरज जाधव, पिंटू पठाडे, राजू डाके,अमेय धिरडे, गणेश मिसाळ, रमेश कदम, अमित गाली, परेश खराडे, प्रवीण सुंकी, अशोक ढवळे आदी उपस्थित होते.

Sangram Jagtap : भूमिगत गटार व काँक्रिटीकरण रस्त्याचा ५० वर्षांपूर्वीचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार; आमदार संग्राम जगताप यांची ग्वाही
Sangram Jagtap : भूमिगत गटार व काँक्रिटीकरण रस्त्याचा ५० वर्षांपूर्वीचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार; आमदार संग्राम जगताप यांची ग्वाही

नक्की वाचा : श्रीरामपूर-नेवासा राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन

आमदार जगताप म्हणाले (Sangram Jagtap)

ही भूमिगत गटार ४० ते ५० वर्षांपूर्वी झालेली असल्याने ती जुनी आणि खराब झाल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर वाहत जाऊन त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त होत आहे त्यामुळे नागरिक,व्यापारी, दुकानदार यांना नाहक त्रास सहन करावा लागतो, या भागात पावसाळ्यात रस्यावर सतत पाणी साचत असल्याने खड्डे पडून रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे हा रस्ता मार्गी लागावा यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला असून डांबरीकरण न करता लवकरच भूमिगत गटार व रस्ता काँक्रिटीकरणाचे काम नियोजनबद्ध व कायमस्वरुपी मार्गी लागणार आहे, आमच्यासारख्या कार्यकर्त्याकडून शासनाकडे पाठपुरावा करत मनपाकडे थेट निधी वर्ग झाला आहे, नागरिकांच्या सूचनेनुसार शहरात विकासाची कामे सुरु आहे, असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here