Sangram Jagtap : नगर : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) प्रचारार्थ शहरामध्ये फिरत असताना मिळत असलेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादामुळे माझा विजय निश्चित झाला. पुढील पाच वर्षे आपण सर्वजण मिळून शहर विकासाला गती देऊ त्या माध्यमातून विकसित शहर निर्माण करू. त्यामुळे मोठे उद्योग कारखाने आपल्या शहरात एमआयडीसीमध्ये (MIDC) येतील. त्या माध्यमातून युवक युवतींना रोजगार उपलब्ध होईल व आपल्या शहराची आर्थिक उन्नती झपाट्याने वाढेल. डाळ मंडई ही महाराष्ट्रातील (Maharashtra) अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळखली जात आहे. झपाट्याने होत असलेल्या विकासामुळे शहराचे विस्तारीकरण वाढत असून व्यापारीकरणाला अजून गती प्राप्त होईल, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी केले.
अवश्य वाचा : विकासकामे न करता विरोधकांचे वेगळ्याच विषयावर राजकारण : मोनिका राजळे
मंगल गेट परिसरात नागरिकांशी संवाद
अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी विकास यात्रेच्या माध्यमातून मंगल गेट परिसरामध्ये नागरिकांशी संवाद साधला. यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती सचिन जाधव, वर्चस्व ग्रुपचे अध्यक्ष सागर मुर्तडकर, माजी नगरसेविका अश्विनी जाधव, योगेश गलांडे, डॉ. विजयकुमार भंडारी, कमलेश भंडारी, सुनील लालबोंद्रे आदी उपस्थित होते.
नक्की वाचा : जिल्ह्यात १५ नोव्हेंबरपासून अवकाळीची शक्यता!
आमदार जगताप म्हणाले (Sangram Jagtap)
मंगलगेट, वंजार गल्ली, डाळ मंडई, मंगळवार बाजार, सर्जेपुरा, तेलीखुंट, रामवाडी, कोठला परिसर, लालटाकी परिसरातील नागरिकांशी संवाद यात्रेच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले नगरकर नेहमीच चांगले कामाच्या पाठीमागे उभे राहत असतात, असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.