Sangram Jagtap : नगर : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) प्रचाराच्या धावपळीतून माजी नगरसेविका शीतल जगताप यांनी काही काळ उसंत घेत जिजाऊ ग्रुपच्या महिलांबरोबर ध्यान व काही योगासने (Yoga) केली. तसेच महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांना मतदान करण्याचे आवाहन केले.
नक्की वाचा : “मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही”- देवेंद्र फडणवीस
विविध भागांमध्ये महिलांच्या भेटी घेऊन प्रचार
विधानसभा निवडणुकीच्या रणभूमीत पूर्ण जगताप कुटुंबीय उतरले आहे. आमदार जगताप यांच्या पत्नी शीतल जगताप शहरातील विविध भागांमध्ये महिलांच्या भेटी घेऊन प्रचार करत आहेत. आनंदऋषीजी हॉस्पिटल जवळील विविध वसाहतींमध्ये प्रचारा दरम्यान त्यांनी महावीर इंटरनॅशनलच्या हॉलमध्ये सुरु असलेल्या जिजाऊ ग्रुपच्या योगा सेंटरला भेट दिली. तेथे योगसाधना करणाऱ्या महिलांशी संवाद साधत थोडावेळ थांबून ध्यान व काही योगासने केली. यावेळी योग प्रशिक्षक मनीषा गुगळे यांनी शीतल जगताप, पूजा गोंडाळ व माजी नगरसेवक संजय चोपडा यांचे स्वागत करून सत्कार केला.
अवश्य वाचा : डाळ मंडई ही महाराष्ट्रातील अग्रेसर बाजारपेठ : संग्राम जगताप
शीतल जगताप म्हणाल्या, (Sangram Jagtap)
आमदार संग्राम जगताप हे सर्वांसाठी कायम उपलब्ध राहून सर्वांची काळजी घेणारे आमदार आहेत. कोरोना काळात त्यांनी केलेले मदत कार्य सर्वश्रुत आहे. शहर विकासाचा ध्यास घेत सर्वांना अपेक्षित असलेला विकास त्यांनी साधला आहे. आता शहराला मेट्रोसिटी करण्याचा चंग बांधला त्यांनी आहे. त्यांना आपल्या सर्वांची खंबीर साथीची गरज आहे. यासाठी या निवडणुकीत शहराच्या विकासासाठीच मतदान करून संग्राम जगताप यांना पुन्हा संधी द्यावी, असे आवाहन केले.