Sangram Jagtap : नगर : अहिल्यानगर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी प्रभाग आठ मधील बोरुडेमळा परिसरात नगर विकास यात्रा काढून मतदारांशी (Voter) संवाद साधला. यावेळी या परिसरातील प्रलंबित समस्या सोडवून विकासकामे केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी आमदार संग्राम जगताप यांच्या फ्लेक्सच्या फोटोला दुग्धाभिषक करत अनोख्या पद्धतीने स्वागत करून त्यांचे आभार मानले.
नक्की वाचा : “मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही”- देवेंद्र फडणवीस
नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित
बोरुडेमाळ्या मधील द्वारका नगरी, गंदे माळा, सुडके मळा, लेंडकर मळा, बागडे मळा परिसरातून नगर विकास यात्रा काढून नागरिकांशी आमदार संग्राम जगताप यांनी संवाद साधला. यावेळी माजी नगरसेवक दगडू पवार, संदीप बोरुडे, प्रा.अरविंद शिंदे, राजू कोकणे, गौरव बोरुडे, प्रशांत बोरुडे, सुजित बोरुडे, भरत जाधव, रत्नाकर कुलकर्णी, विजय बोरुडे, दीपक खेडकर, डॉ. एस.टी.देशमुख, गणेश शिंदे, बबलू सुडके, ओमकार बोरुडे, ओमकार लेंडकर, चिंटू आडसुळे, काका शेळके, दत्ता ठाणगे, प्रशांत घाडगे, अक्षय जाधव, सचिन मुदगल, संतोष लांडे, दादा पांडुळे आदींसह परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अवश्य वाचा : डाळ मंडई ही महाराष्ट्रातील अग्रेसर बाजारपेठ : संग्राम जगताप
आमदार संग्राम जगताप म्हणाले, (Sangram Jagtap)
बोरुडे मळा परिसरातून जाणाऱ्या सीना नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात परिसरातील नागरिकांचे हाल होत असे. त्यामुळे हा महत्वाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करत नव्या पुलासाठी निधी मंजूर केला. आता नदीवरील पूल बांधून पूर्ण झाल्याने बोरुडेमळ्यातील शेकडो शेतकऱ्यांचा दळणवळणाचा प्रश्न लावला मार्गी लावला आहे. शहरात विकास कामे करताना स्थानिक नागरिकांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे या निवडणुकीत सर्व भागांमधून नागरीकांचे पाठबळ मला मिळत आहे. शहराच्या उज्वल भवितव्यासाठी नगरकरांनी मला पुन्हा संधी द्यावी, असे आवाहन आमदार जगताप यांनी केले.
आपले आमदार हे नामदार होणारच
बोरुडे मळ्यालगत सीना नदीचे पात्र आहे. नदीपात्राच्या पलीकडे शकडो शेतकऱ्यांची शेत जमीन आहे. नदीवर पूर नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान व मोठ्या प्रमाणात हाल होत असे. मात्र शेतकऱ्यांची व नागरिकांची जाण असलेले आमदार संग्राम जगताप यांनी कमी अवधीमध्ये पूल बांधून या परिसराचा ज्वलंत प्रश्न सोडवला आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या मनात समाधान व आमदार संग्राम जगताप यांच्या बद्दल मोठी आस्था आहे. त्याच बरोबर सीना नदीचे सुशोभीकरण, बालिकाश्रम रस्त्याचे काँक्रिटीकरण, बोरुडे मळ्यातील सर्व अंतर्गत रस्त्यांची कामे, सुरळीत पाणीपुरवठा, लाईट, ड्रेनेज असे अनेक प्रश्न आमदार जगतापांनी मार्गी लावल्यामुळे आपले आमदार हे नामदार होणारच, अशी प्रतिक्रिया परिसरातील सामाजिक कार्यकर्ते संदीप बोरुडे यांच्यासह नागरिकांनी दिल्या.