Sangram Jagtap : नगर : विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Elections) महायुती मधील पक्षांच्या सर्व महिला पदाधिकारी गेल्या महिनाभरा पासून भरपूर मेहनत घेत प्रचार करत आहेत. आपापल्या पक्षाच्या विचारधारेने काम करत महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्यासाठी एकत्र आल्या आहेत. या निवडणुकीत महिलांचे मतदान खूप महत्वाचे आहे. या नारीशक्तीत खूप ताकद आहे. शहरातील नारीशक्तीने आमदार संग्राम जगताप यांच्या मागे ताकद उभारली असल्याने ते सर्वाधिक मतांनी विजयी होतील. यासाठी आपापल्या भागांमध्ये जास्तीत जास्त मतदान घडवून आणावे. सर्व लाडक्या बहिणींनी आजपर्यंत केलेल्या मेहनतीची पावती आपल्या लाडक्या भैय्या निवडून आणून द्यावे, असे आवाहन माजी नगरसेविका शीतल जगताप (Sheetal Jagtap) यांनी केले.
नक्की वाचा : झाशीमध्ये मृत्यूतांडव! रुग्णालयाच्या आगीत १० नवजात अर्भकांचा मृत्यू
महिला पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता काहीच दिवस बाकी आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त मतदान घडवून आणण्यासाठी महायुती मधील भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना व आरपीआय आठवले गट या तिन्ही पक्षांच्या महिला पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक झाली. माजी नगरसेविका शीतल जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत तिन्ही पक्षांच्या महिला आमदार संग्राम जगताप यांच्या विजयासाठी एकवटल्याचे दिसून आले. यावेळी भाजपच्या प्रिया जानवे, गीता गिल्डा, सुरेखा विद्ये, सविता कोटा, गीतांजली काळे, श्वेता पंधाडे, ज्योती दांडगे, कालिंदी केसकर, शिवसेनेच्या शिवसेना पुष्पा येळवंडे, आरपीआयच्या जया गायकवाड, राष्ट्रवादीच्या लतिका पवार, रेश्मा आठरे आदी उपस्थित होत्या. यावेळी उमेदवार जगताप यांना विजया बरोबरच मंत्रिपदासाठीही जोरदार घोषणा दिल्या.
अवश्य वाचा : शेतकरी व नागरिकांनी आमदारांच्या फोटोला दुग्धाभिषक करत केले अनोखे स्वागत
यावेळी गीता गिल्डा म्हणाल्या, (Sangram Jagtap)
आपले महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप हे अनुभवी उमेदवार आहेत. त्यांच्याकडे विकासाचे व्हिजन आहे. त्यामुळे आपल्या अहिल्यानगरीच्या भवितव्यासाठी त्यांनी तिसऱ्यांदा आमदार होणे आवश्यक आहे. त्यांच्या विजयासाठी सर्व महिलांनी काम करावे.
पुष्पा येळवंडे म्हणाल्या, राज्यात महायुतीचे सरकार येण्याआधी महा भकास सरकार सत्तेत होते. या बिघाडी सरकारने सर्व नागरिकांना त्रास दिलाच पण एसटी कर्मचाऱ्यांना खूप त्रास दिला आहे. मी एसटी कर्मचारी परीवारामधील असल्याने मी हा त्रास भोगला आहे. त्यामुळे हे सरकार उलथून लावले हे योग्यच केले.
प्रास्तविकात रेश्मा आठरे म्हणाल्या, महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या मागे सर्व महिलांची ताकद आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये त्यांचा होणारा विजय रेकॉर्डब्रेक असे सांगून सर्व महिला पदाधिकारी एकत्र आल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. बैठकीचे संयोजन व सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा निवडणूक समन्वयक सुमित कुलकर्णी यांनी केले.