Sangram Jagtap : आमदार जगताप यांच्या मंत्रिपदासाठी शुक्लेश्‍वर मंदिरात महाअभिषेक

Sangram Jagtap : आमदार जगताप यांच्या मंत्रिपदासाठी शुक्लेश्‍वर मंदिरात महाअभिषेक

0
Sangram Jagtap : आमदार जगताप यांच्या मंत्रिपदासाठी शुक्लेश्‍वर मंदिरात महाअभिषेक
Sangram Jagtap : आमदार जगताप यांच्या मंत्रिपदासाठी शुक्लेश्‍वर मंदिरात महाअभिषेक

Sangram Jagtap : नगर : नगर शहर विधानसभा (Assembly) मतदार संघात तिसऱ्यांदा सलग निवडून आलेले आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांना मंत्रिपद मिळण्यासाठी भिंगार येथील ग्रामदैवत शुक्लेश्‍वर मंदिरात महाअभिषेक घालण्यात आला. शुक्लेश्‍वर मंदिरात विधीवत पूजा झाली. याप्रसंगी भिंगार राष्ट्रवादीचे (NCP) शहराध्यक्ष संजय सपकाळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भिंगार शहराध्यक्ष शिवम भंडारी, अनिल तेजी, किशोर उपरे, गणेश उपरे, विशाल बेलपवार, दीपक राहिंज, विशाल राहिंज, आनंद क्षीरसागर आदी उपस्थित होते.

नक्की वाचा : ‘विरोधकांना मी पुन्हा माफ केले हाच माझा बदला’- देवेंद्र फडणवीस

संजय सपकाळ म्हणाले की,

संग्राम जगताप हे युवकांचे नेतृत्व असून, त्यांनी शहर व उपनगरांचा विकासात्मक कायापालट केला आहे. त्यांच्या माध्यमातून शहराला मंत्री पदाची संधी मिळावी ही सर्वसामान्य नगरकरांची इच्छा आहे. अनेक वर्षापासून शहराला मंत्री मंडळात स्थान मिळालेले नाही. सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले आ. जगताप यांना मंत्रीपद मिळावे ही सर्वांची इच्छा असल्याचे त्यांनी व्यक्त केले.

Sangram Jagtap : आमदार जगताप यांच्या मंत्रिपदासाठी शुक्लेश्‍वर मंदिरात महाअभिषेक
Sangram Jagtap : आमदार जगताप यांच्या मंत्रिपदासाठी शुक्लेश्‍वर मंदिरात महाअभिषेक

अवश्य वाचा : नगर-पुणे इंटरसिटी लाईनचे काम सुरू करा; खासदार लंके यांची संसदेत मागणी

शिवम भंडारी म्हणाले की, (Sangram Jagtap)

शहराच्या सर्वांगीन विकासासाठी आमदार जगताप यांना मंत्रिपद मिळणे आवश्‍यक आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन शहरातील विकास कामे मार्गी लावली. विकासात्मक व्हिजन असलेले आमदार जगताप यांची मंत्रीमंडळाला देखील चांगली मदत होणार असून, शहराच्या इतिहासात सर्वाधिक निधी आणणारे आमदार म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. विकासाचे व्हिजन ठेऊन त्यांनी केलेल्या कामाला यापुढे अधिक गती मिळणार आहे. तर त्यांच्या माध्यमातून मेट्रो सिटीचे स्वप्न साकारले जाणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here