Sangram Jagtap : जिद्द, चिकाटी व मेहनतीने यशाचे शिखर गाठता येते – संग्राम जगताप

Sangram Jagtap : जिद्द, चिकाटी व मेहनतीने यशाचे शिखर गाठता येते - संग्राम जगताप

0
Sangram Jagtap : जिद्द, चिकाटी व मेहनतीने यशाचे शिखर गाठता येते - संग्राम जगताप
Sangram Jagtap : जिद्द, चिकाटी व मेहनतीने यशाचे शिखर गाठता येते - संग्राम जगताप

Sangram Jagtap : नगर : जिल्ह्यामध्ये चांगले क्रिकेटर (Cricketer) निर्माण करण्यासाठी बालवयातच क्रिकेटचे धडे मिळावेत यासाठी लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे (Cricket Tournament) आयोजन होणे गरजेचे आहे. मागील ८ वर्षांपासून बाळासाहेब पवार स्मृती करंडक क्रिकेट स्पर्धेतून चांगले खेळाडू निर्माण होत आहेत. १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघात (Indian Cricket Team) जिल्ह्यातील किरण चोरमले आणि अनुराग कवडे हे दोन खेळाडू खेळत आहेत, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी केले.

Sangram Jagtap : जिद्द, चिकाटी व मेहनतीने यशाचे शिखर गाठता येते - संग्राम जगताप
Sangram Jagtap : जिद्द, चिकाटी व मेहनतीने यशाचे शिखर गाठता येते – संग्राम जगताप

नक्की वाचा : साखर कारखानदार व शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी यांची बैठक निष्फळ

बाळासाहेब पवार स्मृती करंडक जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा

वाकोडी येथील साईदीप मैदानावर अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने व आंजनेय प्रतिष्ठान आयोजित बाळासाहेब पवार स्मृती करंडक जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आनंदऋषी हॉस्पिटलचे डीएम कार्डिओलाॅजिस्ट डॉ. राहुल अग्रवाल तसेच रणजीपटू अनुपम संकलेचा, सुमतीलाल कोठारी, प्रा. माणिकराव विधाते, गणेश गोंडाळ, अरुण नाणेकर, डॉ. राहुल पवार, कपिल पवार, पी. डी कुलकर्णी, संदीप पवार, दिलीप पवार, संदीप घोडके, निखिल पवार, अजय कविटकर आदी उपस्थित होते.

अवश्य वाचा : शेवगाव, पाथर्डीत घरफोडी करणारी टोळी जेरबंद; गुन्हे शाखेकडून नऊ गुन्ह्याची उकल

पहिल्यांदाच गुलाबी चेंडूवर स्पर्धा (Sangram Jagtap)

कपिल पवार म्हणाले की, बाळासाहेब पवार स्मृती करंडक जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेला ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. या स्पर्धेमध्ये १४,१६ व १९ वर्षांखालील खेळाडू खेळत असून पहिल्यांदाच गुलाबी चेंडूवर ही स्पर्धा होत आहे. या स्पर्धेमध्ये जिल्हाभरातील सुमारे ४५० खेळाडू सहभागी होणार आहेत. 19 वर्षाखालील गटात ८ संघ सामील झाले असून हे सामना २० षटकांचे होणार आहेत. १४ व १६ वर्षांखालील मुलांना क्रिकेटचे अचूक ज्ञान मिळावे जास्त वेळ मैदानावर थांबता यावे यासाठी ४० षटकांचा सामना होणार आहे. यात १४ वर्षांखालील गटात १२ संघ सामील झाले तर १६ वर्षांखालील गटात ८ संघ सामील झाले आहे. हे सर्व सामने बाद पद्धतीने खेळविले जात आहे. स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडू घडला जात असतो. त्यासाठी बाळासाहेब पवार स्मृती करंडक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे, असे त्यांनी सांगितले.