Sangram Jagtap : नगर : महाराष्ट्र राज्य सरकारने (Maharashtra State Government) गोमातेला राज्यमाता घोषित केले असून गोवंश हत्या बंदी कायदा असताना देखील काही समाजकंटक त्या कायद्याची पायमल्ली करत आहे. मागील आठवड्यात गुन्हे अन्वेषण पथकाकडून (Crime Investigation Team) अहिल्यानगर जिल्ह्यातील झेंडीगेट, ममतापूर, श्रीरामपूर आदींसह विविध ठिकाणच्या अवैध कत्तलखान्यावर छापा टाकून हजारो गोवंश वाचवण्यात आले असून ५० हजार किलो गोमास जप्त करण्यात आले आहे. तातडीने कत्तलखाने भुईसपाट करावी, हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे हिंदू समाज प्रचंड क्रोधीत झाला आहे. तरी कायदा सुव्यवस्थेचा (Law and Order) मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. निवेदनासोबत पुरावे देखील सादर करत असून पुढील कारवाई तातडीने करावी, अशी मागणी बजरंग दलातर्फे गोरक्षक प्रमुख पश्चिम महाराष्ट्र प्रांत ऋषिकेश भागवत यांनी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap), माजी नगरसेवक विपुल शेटिया यांच्यासह गोरक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नक्की वाचा : आंबेडकरवादी समाजाची कचेरीसमोर निदर्शने; परभणी घटनेचा केला निषेध
हजारो गोवंश वाचवल्याबद्दल पोलिसांचा सत्कार
दरम्यान, पोलीस प्रशासन व आमदार संग्राम जगताप यांच्या सहकार्यातून गेल्या आठवड्यात गुन्हे अन्वेषण पथकाकडून अवैध कत्तलखान्यावर छापा टाकून हजारो गोवंश वाचवल्याबद्दल बजरंग दलातर्फे यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर आणि आमदार संग्राम जगताप आदींचा गो मातेची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.
अवश्य वाचा : शहरातील ९० हजार मालमत्तांवर लावले ‘क्यूआर कोड’; अहिल्यानगर महापालिकेचा उपक्रम
आमदार जगताप म्हणाले की, (Sangram Jagtap)
अहिल्यानगर जिल्हा हा गोहत्या मुक्त झाला पाहिजे यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी. गाय ही हिंदू धर्माची गोमाता आहे. गाईंना वाचविण्यासाठी आमचे सहकार्य राहील, असे त्यांनी सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला म्हणाले की, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने अवैध कत्तलखान्यावर मोठी कारवाई केली जात असून गुन्हे दाखल केले आहे. गोहत्या करणाऱ्यांना तडीपार केले जाईल. गोरक्षकांनी देखील कायद्याचे पालन करावे. जेणेकरून अनुचित घटना घडणार नाही. कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करीत असताना एखादा अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही तरी पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा. आम्ही नेहमीच कठोर कारवाई करत आहोत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली.