Sangram Jagtap : महापालिकेचे नाट्य संकुल लवकरच नगरकरांच्या सेवेत सुरू होणार – संग्राम जगताप

0
Sangram Jagtap : महापालिकेचे नाट्य संकुल लवकरच नगरकरांच्या सेवेत सुरू होणार - संग्राम जगताप
Sangram Jagtap : महापालिकेचे नाट्य संकुल लवकरच नगरकरांच्या सेवेत सुरू होणार - संग्राम जगताप

Sangram Jagtap : नगर : महापालिकेच्या (AMC) माध्यमातून नगरकरांच्या हक्काचे नाट्यसंकुल (Natya Sankul) शहरात असावे यासाठी महापौर (Mayor) असताना काही प्रमाणात शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला आणि कामाला देखील सुरुवात झाली. मात्र, या कामामध्ये काही ना काही अडचणी निर्माण होत गेल्या. त्यावर मात करीत शासनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुमारे ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यानंतर नाट्य संकुलनाचे सिव्हिल वर्कचे काम अंतिम टप्प्यात आले. महापालिका प्रशासनाने ठेकेदार बदलला असून उर्वरित काम येत्या चार महिन्यात पूर्ण होईल आणि नाट्य कलाकारांचे (Drama Artist) हक्काचे व्यासपीठ लवकरच नगरकरांच्या सेवेत सुरू होणार आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी केले.

नक्की वाचा : देवेंद्र फडणवीस यांनी किती जणांचे रक्ताचे डाग धुवून त्यांना सरकारमध्ये घेतलं?;संजय राऊतांचा सवाल

नाट्यसंकुल कामाची आमदार जगताप यांनी पाहणी केली

सावेडी उपनगरातील प्रोफेसर कॉलनी चौक येथील महापालिकेच्या नाट्यसंकुल कामाची आमदार संग्राम जगताप यांनी पाहणी केली. यावेळी आयुक्त यशवंत डांगे, माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक धनंजय जाधव, निखिल वारे, संजय चोपडा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, शहर अभियंता मनोज पारखे, आर्किटेक मनोज जाधव, अजय दगडे, मुकुल गंधे, नाट्य कलाकार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अध्यक्ष अमोल खोले, उपाध्यक्ष शशिकांत नजान, ज्येष्ठ रंगकर्मी पी.डी.कुलकर्णी, श्रेणिक शिंगवी, स्वप्नील मुनोत, प्रसाद बेडेकर, अनंत रिसे, गायक पावन नाईक, अनंत द्रविड आदी उपस्थित होते.

अवश्य वाचा : गणेश मूर्तिकार वरील कारवाई थांबावी; संघटनेचे सभापती राम शिंदे यांना निवेदन

आमदार जगताप म्हणाले, (Sangram Jagtap)

अहिल्यानगर शहराला नाट्य चळवळीचा मोठा वारसा लाभलेला असून आपले नाट्य कलाकार राज्यात कला सादर करून नावलौकिक वाढवत आहे त्यांना हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि अनेक वर्षाची त्यांची मागणी पूर्ण केली आणि नाट्यसंकुलचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल, असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

श्रेणिक शिंगवी यांनी सांगितले की, (Sangram Jagtap)

१४ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नाट्य संकुलन उभे राहावे यासाठी नाट्य कलाकार महापालिकेवर मोर्चे,आंदोलने केली, हक्काचे व्यासपीठ असावे यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आणि आमच्या लढ्याला यश आले लवकरच नाट्य संकुलनाचे काम पूर्ण होऊन या ठिकाणी युवा नाट्य कलाकारांना आपली कला सादर करता येईल, असे नाट्य कलाकार श्रेणिक शिंगवी यांनी स्पष्ट केले.

महापालिका आयुक्त यशवंत डांगे म्हणाले, नाट्य संकुलनाचे काम मार्गी तातडीने मार्गी लागावे यासाठी उपाययोजना करत कामाला गती दिली. मागील तीन महिन्यांमध्ये सिव्हिल वर्कचे काम पूर्ण होईल आणि नाट्य कलाकारांना बरोबर घेऊन लाईट सिस्टीम, साऊंड सिस्टिम, बैठक व्यवस्था, चेंजिंग रूम, व्हीआयपी रूम याबाबत चर्चा करून पुढील कामालाही सुरुवात केली जाणार असल्याची माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली.