Sangram Jagtap : नगर : आपल्याला धार्मिकतेचा (Religion) मिळालेला वारसा असाच अखंडितपणे सुरू राहण्यासाठी काम करू. समाजाचे असलेले प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी काम करेल, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी केले.
नक्की वाचा : शेतीचे उत्पादन वाढविण्यास केंद्र शासनाचे सर्वोच्च प्राधान्य: चौहान
संग्राम जगताप तिसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल सत्कार
अहिल्यानगर हिंदू मोची सेवा संघातर्फे आमदार संग्राम जगताप तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत निवडून आल्याबद्दल सत्कार झाला. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी सभापती अविनाश घुले, पदाधिकारी, जी नगर युवा मंच सर्व सभासद, सर्व समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
अवश्य वाचा : संतोष देशमुख हत्या प्रकरणी अंबादास दानवेंनी केली ‘ही’ मागणी
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, (Sangram Jagtap)
शहर विकासाचे अनेक वर्षाचे स्वप्न साकारताना दिसत आहे. यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केल्यामुळेच मोठा निधी मंजूर झाला आहे. ती कामे सुरू आहे. नगरकर ही आता विकास कामांची चर्चा करू लागले आहे. याचबरोबर आपला हिंदू धर्माची संस्कृती जोपासण्यासाठी आपल्याला एकत्रित येऊन काम करावे लागणार आहे. वर्षभर विविध धार्मिक, अध्यात्मिक, सन-उत्सव साजरे करीत आपले संस्कार जोपासत आजच्या तरुण पिढीला याची माहिती होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी अहिल्यानगर हिंदू मोची समाजसेवा संघातर्फे आमदार संग्राम जगताप यांना विविध प्रश्नांचे निवेदन देत सांगितले की कापड बाजार येथील मोची गल्लीचे नामकरण श्री रामदेव बाबाजी मार्ग असे करावे याचबरोबर समाजाच्या विविध धार्मिक कार्यक्रमासाठी समाज मंदिर उभारणीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, आदींसह विविध प्रश्नांची मागणी आमदार संग्राम जगताप यांना निवेदनाद्वारे केली.