Sangram Jagtap : आमदार जगताप यांना पुढील वेळी नक्कीच मंत्रिमंडळात स्थान मिळेल : कांतीलाल गांधी

Sangram Jagtap : आमदार जगताप यांना पुढील वेळी नक्कीच मंत्रिमंडळात स्थान मिळेल : कांतीलाल गांधी

0
Sangram Jagtap : आमदार जगताप यांना पुढील वेळी नक्कीच मंत्रिमंडळात स्थान मिळेल : कांतीलाल गांधी
Sangram Jagtap : आमदार जगताप यांना पुढील वेळी नक्कीच मंत्रिमंडळात स्थान मिळेल : कांतीलाल गांधी

Sangram Jagtap : नगर : सारसनगर येथील जैन स्थानक उभारणीसाठी जगताप कुटुंबीयांनी मोलाचे योगदान दिले आहे. सारसनगर परिसरातील जैन समाजस वेळोवेळी आ. जगतापांचे मोलाचे सहकार्य असते. सर्व नागरिकांच्या समस्या सोडवून त्यांनी जो विकास केला त्याचेच फळ त्यांना विजयाच्या रूपाने मिळाले आहे. या वेळच्या शपथविधी मध्ये संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांचे मंत्रिपद (Ministerial Post) जरी हुकले असले तरी पुढील वेळी त्यांना नक्कीच मंत्रिमंडळात (Cabinet) स्थान मिळेल, असे प्रतिपादन सारसनगर जैन श्रावक संघाचे अध्यक्ष कांतीलाल गांधी यांनी केले. 

नक्की वाचा : मोठी बातमी!संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक

विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल सत्कार

सारसनगर येथील जैन श्रावक संघाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांनी तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत हॅटट्रिक केल्याबद्दल त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष पोपटलाल भंडारी, सचिव दिलीप मेहेर, सहसचिव भारत बोरा, आदींसह माजी नगरसेवक संजय चोपडा, विपुल शेटीया, प्रकाश भागानगरे, डॉ. विजय भंडारी, कमलेश भंडारी आदींसह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Sangram Jagtap : आमदार जगताप यांना पुढील वेळी नक्कीच मंत्रिमंडळात स्थान मिळेल : कांतीलाल गांधी
Sangram Jagtap : आमदार जगताप यांना पुढील वेळी नक्कीच मंत्रिमंडळात स्थान मिळेल : कांतीलाल गांधी

अवश्य वाचा : चीनमध्ये ह्युमन मेटापन्यूमो व्हायरसचा हाहाकार; भारताला धोका?

आमदार संग्राम जगताप म्हणाले, (Sangram Jagtap)

सारसनगर हे माझे होमग्राउंड आहे. या भागातील नागरिकांनी प्रत्येकवेळी मला मोठे पाठबळ दिले आहे. त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. या भागाचा विकास करून एक आदर्श उपनगर म्हणून आता सारसनगरची नव्याने ओळख निर्माण झाली आहे. जैन श्रावक संघाच्या सर्व वडीलधाऱ्या पदाधिकाऱ्यांनी माझा सत्कार करून मला आशीर्वाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. यावेळी सारसनगर जैन श्रावक संघाचे संचालक शांतीलाल शिंगवी, अजित भंडारी, प्रवीण भंडारी, मिश्रीलाल गुगळे, सतीश पारख, कांतीलाल भंडारी, रसिकलाल गांधी, अशोक खीवरसा, हिरालाल चोपडा व हिरालाल गांधी अॅड.पी.एम.भंडारी, विनोद पटवा, विनोद बलदोटा व चंपालाल गुंदेचा आदी उपस्थित होते.