Sangram Jagtap : बांग्लादेशी घुसखोरांवर कारवाई करा; संग्राम जगतापांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sangram Jagtap : बांग्लादेशी घुसखोरांवर कारवाई करा; संग्राम जगतापांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

0
Sangram Jagtap : बांग्लादेशी घुसखोरांवर कारवाई करा; संग्राम जगतापांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
Sangram Jagtap : बांग्लादेशी घुसखोरांवर कारवाई करा; संग्राम जगतापांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sangram Jagtap : नगर : अहिल्यानगर शहरातील काही आधार केंद्र (Aadhaar Center), सेतू कार्यालयातून जिहादी टोळीच्या माध्यमातून जाणीवपूर्वक स्थलांतरित बांग्लादेशी लोकांना (Bangladeshi People) बनावट आधार कार्ड, रेशन कार्ड ओळखपत्र देण्याचे काम जिहादी विचाराची टोळी करत आहे, असा आरोप आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी केला आहे. त्यांनी आज (ता. १०) जिल्हाधिकारी कार्यालय (District Collector’s Office) येथे जाऊन जिल्हाधिकारी यांची भेट घेत एका आयडीवर ४ ते ५ सेतू केंद्र चालविले जात आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

अवश्य वाचा : शेवगाव येथील मंदिर सेवेकऱ्याच्या हत्येची उकल

अधिकाऱ्यांना हाताशी धरून बोगस दाखले दिल्याचा आरोप

जिहादी विचारांचे कार्यालय निर्माण झाले असून जिहादी विचाराचे अधिकाऱ्यांना हाताशी धरून बोगस रहिवासी दाखले दिले जात आहे. गो.रा. खैरनारसारख्या अधिकाऱ्याला देखील नीट केले जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे आमदार संग्राम जगताप यांनी दिला आहे.

नक्की वाचा : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून ५ लाख महिला अपात्र

तसेच शहरातील बेकायदा बांधकाम, (Sangram Jagtap)

अतिक्रमणे तसेच निवासी बांगलादेशी कारवाईबाबत महापालिकेतील आयुक्ताच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. उपनगरातील अनेक परिसरात बांग्लादेशी नागरिक तसेच जिहादी प्रवृत्तीच्या लोकांकडून अनधिकृत अतिक्रमणे करून जागा बळकावण्याचा प्रकार सर्रासपणे सुरू असल्याचे आयुक्तांना निदर्शनात आणून देत कारवाईची मागणी केली. यावेळी माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, निखिल वारे, सुरेश बनसोडे, वैभव ढाकणे, आकाश दंडवते, केतन क्षीरसागर, विजय सुंबे, संतोष ढाकणे आदी उपस्थित होते.