Sangram Jagtap : नगर : केंद्र व राज्यात हिंदू धर्माचे (Hinduism) संरक्षण करणारी सत्ता आहे. आता पुढील काळात होणाऱ्या निवडणुकीमध्ये अहिल्यानगर महापालिकेवर (AMC) देखील हिंदू धर्म विचाराची सत्ता बसविणार आहे. शहर विकासाच्या योजनांबरोबरच आध्यात्मिकतेचा वारसा अखंडितपणे पुढे घेऊन जाण्याचे काम आपल्या सर्वांना करावे लागणार असल्याचे, प्रतिपादन आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी केले आहे. तसेच चुकीच्या गोष्टी सहन करणार नसून ‘जिधर आयेंगा अली, उधर आयेंगा बजरंग बली’, अशी घोषणा आमदार संग्राम जगताप यांनी दिली.
नक्की वाचा : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी;’या’ दिवसापर्यंत प्लॅटफॉर्म तिकिटांची काउंटर विक्री बंद
दक्षिणमुखी हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार कामाचे भूमिपूजन
प्रेमदान हडको येथे दक्षिणमुखी हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार व सभामंडप उभारणी कामाचे भूमिपूजन आमदार जगताप यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी नगरसेवक सतीश शिंदे, करण कराळे, अंजली आव्हाड, विलास शिंदे, मयूर कुलथे, सागर मुर्तडकर, सचिन जगताप, शिवजीत डोके, आप्पा खताडे, किशन गायकवाड, मयूर बांगरे, अमित खामकर, प्रसाद डोके, शुभम भगत, तात्या सेंदर आदी उपस्थित होते.
अवश्य वाचा : वांजोळीत दाणी वस्तीवर जबरी चोरी; चोरट्यांच्या मारहाणीत पती-पत्नी जखमी
विलास शिंदे म्हणाले, (Sangram Jagtap)
प्रेमदान हडको येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर हे ५० वर्षे पूर्वीचे असून ते भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार व सभा मंडपाचे काम लोकवर्गणीतून होणार आहे. या भागातील नागरिक एकत्र येत वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करत असतात हनुमान जयंती पर्यंत हे मंदिर उभे करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.