
Sangram Jagtap : नगर : फुले ब्रिगेडच्या माध्यमातून वर्षानुवर्षे सामाजिक कार्य सुरू आहे. विविध सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवण्याचे काम त्यांनी केले आहे. महापुरुषांच्या जयंती उत्सवातून त्यांचे विचार रुजविण्याचे कार्य होत आहे. जयंती उत्सवातून नवीन पिढीला महापुरुषांचे विचार व समाजाला दिशा मिळणार आहे. महाराष्ट्रात महात्मा फुले यांनी पहिली शिवजयंती (Shiv Jayanti) साजरी केली व महाराजांचा इतिहास समाजापुढे आणला. शिवजयंतीचे जनक म्हणून प्रत्येकाच्या मनात महात्मा फुले (Mahatma Phule) यांचे नाव कोरले गेले असल्याचे, प्रतिपादन आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी केले.
नक्की वाचा : हिंदू धर्म विचाराची सत्ता महापालिकेवर बसविणार : संग्राम जगताप
पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन
छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली शिवजयंती साजरी करणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा शिवसन्मान सोहळा फुले ब्रिगेडच्या वतीने माळीवाडा येथे पार पडला. महात्मा फुले व शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी फुले ब्रिगेडचे शहराध्यक्ष दीपक खेडकर, भाजप ओबीसी विभागाचे राज्य उपाध्यक्ष किशोर डागवाले, माजी नगरसेवक संजय चोपडा, श्री विशाल गणपती मंदिराचे विश्वस्त प्रा. माणिक विधाते, मोहन कदम, फुले ब्रिगेडचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक खेडकर, डॉ. सुदर्शन गोरे, राजेंद्र पडोळे, बाळासाहेब भुजबळ, डॉ. रणजीत सत्रे, ब्रिजेश ताठे, मळू गाडळकर, किरण जावळे, संतोष हजारे, अशोकराव तुपे, भरत गारुडकर, संकेत ताठे, संकेत लोंढे, ऋषिकेश ताठे, गणेश जाधव, विक्रम बोरुडे, महेश गाडे, किरण मेहेत्रे, महेश सुडके, श्रीकांत आंबेकर, विश्वास शिंदे, दिनेश जोशी, अनुराग पडोळे, सुरंगा विधाते आदींसह युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अवश्य वाचा : वांजोळीत दाणी वस्तीवर जबरी चोरी; चोरट्यांच्या मारहाणीत पती-पत्नी जखमी
दीपक खेडकर म्हणाले की, (Sangram Jagtap)
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा शिवसन्मान सोहळा गेल्या अकरा वर्षांपासून मोठ्या उत्साहात होत आहे. महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांना गुरु माणून त्यांचे कार्य पुढे नेले. त्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावरील पहिला कुळवाडी भूषण हा एक हजार ओळींचा पोवाडा सादर करुन त्यांचे महान कार्य जगासमोर ठेवले. आजही समाजात महापुरुषांच्या विचारांचा अंगीकार करुन त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. फुले ब्रिगेडच्या माध्यमातून महापुरुषांच्या विचाराने समाजातील वंचित घटकांसाठी कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.