Sangram Jagtap | शिवरायांच्या पुतळ्यासाठी आंदोलन दुर्दैवी – संग्राम जगताप

0
Sangram Jagtap
Sangram Jagtap

Sangram Jagtap | श्रीरामपूर : महाराष्ट्र (Maharashtra) छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) आहे. त्यांच्या राज्यात त्यांच्या पुतळ्यासाठी शिवप्रेमींना झटावे लागते. यासारखे दुर्दैव नाही. आज अर्धाकृती पुतळा बसला लवकरच याच ठिकाणी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यासाठी सर्वांनी एकजूट झाले पाहिजे. अतृप्त राजकारण्यांच्या विरोधापुढे झुकून एखादा अधिकारी जनरल डायर बनून पुतळा हटवण्यात आलाच तर सर्वांनी छत्रपती होऊन त्याचा शाहिस्तेखान करून टाका. त्याशिवाय धर्म टिकणार नाही. छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा अहिल्यानगर मध्ये बसवण्याचे काम चालू आहे. परवानगी असो नाहीतर नसो संभाजी राजांचा पुतळा त्याठिकाणी बसणारच. त्यासाठी गटतट सोडून भगव्या खाली प्रत्येकाने आले तरच हे शक्य असल्याचे मत अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी मांडले आहे.

नक्की वाचा : ‘नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत’ 3 हजार रुपये वाढून देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर गावात छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती बसवण्यावरून काही अतृप्त राजकीय शक्तींनी या प्रकरणाला राजकीय वळण देत हिंदू धर्मीयांमध्ये गट पाडून प्रशासनाला महाराजांच्या मूर्ती विरोधात उभे केले आहे. या प्रकरणात हिंदूंनी एक यावे. स्थानिक शिवप्रेमीना हिंदुत्ववादी राजकीय पाठबळ मिळावे म्हणून राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग व अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी भेर्डापूर गावात महाआरतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी जगताप बोलत होते.

अवश्य वाचा : मढी ग्रामसभेतील ठरावाचे जिल्हाभर पडसाद

परवानगी घ्यावी लागणे दुर्दैवी (Sangram Jagtap)

जगताप पुढे म्हणाले की,संपूर्ण महाराष्ट्रच महाराजांचा आहे. त्यांची मूर्ती बसवण्यासाठी परवानगी घ्यावी लागते, याशिवाय दुसरे दुर्दैव नाही. महाराजांनी या मातीत धर्मासाठी प्राणाची आहुती दिली आहे. त्यांची मूर्ती बसवण्याचा गावाने फक्त ठराव घ्यावा. पुढील वरच्या पातळीवर त्याला पाठबळ द्यायचे काम आम्ही करूच पण गावातील प्रत्येक हिंदूंनी एक होऊन गट तट विसरून एक राहिले पाहिजे. बसवलेल्या मूर्ती विरोधात कोणी प्रशासकीय अधिकारी जनरल डायरच्या रूपात गावात आलाच तर आपणही प्रत्येकाने शिवाजी महाराज होऊन त्या अधिकाऱ्याचा शाहिस्तेखान केला पाहिजे, असा सल्ला जगताप यांनी भेर्डापूर ग्रामस्थांना दिल्यावर ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना दाद दिली.

धर्मविरोधी शक्तींविरोधात उभे रहा (Sangram Jagtap)

गावागावातील गटातटाचा फायदा घेत हिरवा गुलाल उधळणारी ढेकणांची पिलावळ एकत्र करत काही राजकीय शक्ती लोकसभा निवडणुकीत उदयाला आल्या. त्यांनी आपल्याला जातीपातीत वाटून आपले ध्रुवीकरण केले. त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसला. जातपात गटतट विसरून धर्मासाठी हिंदूंनी एक होऊन अशा धर्मविरोधी शक्ती विरोधात उभे राहिले पाहिजे. अहिल्यानगर शहरात सध्या चालू असलेला छावा चित्रपट महिलांसाठी २४ तारखेपर्यंत मोफत दाखवण्यात येत आहे. आतापर्यंत दहा हजार महिलांनी हा चित्रपट बघितला आहे. महिलांनी हा चित्रपट बघितल्यास ती महिला कुटुंबाला धर्माचे ज्ञान देते. त्या कुटुंबाला पुन्हा धर्म शिकवण्याची गरज पडत नाही असेही मत जगताप यांनी मांडले.

राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी गावातील गटतट विसरून एक होण्याचे आवाहन केले. राजकारण म्हणून आम्ही धर्माचे कार्य करत नसून आपला धर्म जगला पाहिजे म्हणून आमची तगमग आहे. मात्र, हिंदूच असे गटतटात विखरून आपली शक्ती वाया घालवत असतील तर त्याचा फायदा हिंदू विरोधी अधर्मी जिहादी उठवतात. आता हिंदूंच्या विखुरण्याची वेळ राहिलेली नाही. जिहादी शत्रू त्याच्या लक्ष्यावर अटळ आहे. आपल्या आणखी विखुरण्याची तो वाट पाहतोय. छत्रपतींच्या मूर्ती विरोधात गावात गट पडणे योग्य नाही हिंदूंच्या अशा चुकांमुळे जर पुतळा हटवण्यात आलाच तर येणारी पिढी हिंदुत्वाने जागरूक होत आहे. याचा विचारही प्रत्येकाने केला पाहिजे त्यासाठी एक होण्याचे आवाहन बेग यांनी केले.

याप्रसंगी गाव पंचक्रोशीतील असंख्य शिवप्रेमी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा भूषण कुटे, सचिन दांगट, अमोल राऊत, नितीन दांगट यांच्यासह ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here