Sangram Jagtap : अहिल्यानगर महापालिकेतील नगररचना विभागाच्या कारभारावर संग्राम जगतापांनी ओढले ताशेरे

Sangram Jagtap : अहिल्यानगर महापालिकेतील नगररचना विभागाच्या कारभारावर संग्राम जगतापांनी ओढले ताशेरे

0
Sangram Jagtap : अहिल्यानगर महापालिकेतील नगररचना विभागाच्या कारभारावर संग्राम जगतापांनी ओढले ताशेरे
Sangram Jagtap : अहिल्यानगर महापालिकेतील नगररचना विभागाच्या कारभारावर संग्राम जगतापांनी ओढले ताशेरे

Sangram Jagtap : नगर : अहिल्यानगर महापालिकेतील (AMC) नगररचना विभागात सावळा गोंधळ सुरू आहे. या विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या विभागाचा भ्रष्टाचार (Corruption) सहन केला जाणार नाही. ऑनलाइन प्रणालीमधील (Online System) त्रुटी सुधारून अधिक पारदर्शकता आणण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. प्रशासनाने त्वरित सुधारणा न केल्यास आणखी कठोर पावले उचलली जातील, असा इशारा आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी दिला.

नक्की वाचा : बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित;विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची घोषणा

नगररचना विभागात एजंट तयार

आमदार संग्राम जगताप यांनी आज (ता. २६) अहिल्यानगर महापालिकेत नगररचना विभागातील कारभाराबाबत बैठक घेतली.  यावेळी महापालिका आयुक्त यशवंत डांगे, माजी उपमहापौर गणेश भोसले, नगररचनाकार स्नेहल यादव, सहाय्यक नगररचनाकार वैभव जोशी, अश्विनी जाधव, क्रेडाईचे अध्यक्ष अमित मुथा, अमित वाघमारे, दीपक बांगडार, प्रसाद आंधळे, गिरीश अग्रवाल, मयूर कोठारी, सागर गांधी, प्रकाश मेहता, सुनील गुगले, झोइब खान, सीए अमित फिरोदिया, अँड. संदीप भापकर, धवल इंगळे, कमलेश झंवर, एईएसएचे अध्यक्ष आदिनाथ दहिफळे आदी उपस्थित होते. 
बैठकीच्या सुरुवातीला क्रेडाई महाराष्ट्रचे सचिव आशिष पोखरणा यांनी स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली. ते म्हणाले, नगररचना विभागात एजंट तयार झालेत आणि कोणालाही कुठलेही काम करून घेण्यासाठी थेट पैसे मागण्याची लाज वाटेनाशी झाली आहे. हा भ्रष्टाचार थांबायलाच हवा. ऑनलाइन प्रणाली आणल्याने पारदर्शकता वाढण्याऐवजी संपूर्ण घटली असून, भ्रष्टाचाराला अधिक चालना मिळाली आहे, असेही त्यांनी सांगितले.

अवश्य वाचा : माध्यमिक शिक्षक सोसायटीत ‘परिवर्तन’

लाच घेतल्याचा पुरावा मिळाला, तर मी स्वतः तक्रार करेल (Sangram Jagtap)

आमदार संग्राम भैय्या जगताप यांनी त्वरित संबंधित अधिकाऱ्यांचे बदली करण्याचे आदेश दिले. यावेळी त्यांनी आदेश दिले की, जर इथून पुढे एक रुपयाची लाच घेतल्याचा पुरावा मिळाला, तर मी स्वतः त्या व्यक्तीविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार करेल. प्रशासनाने कोणत्याही परिस्थितीत भ्रष्टाचाराला थारा देऊ नये आणि नागरिकांना योग्य सुविधा देण्यासाठी पारदर्शक प्रणाली विकसित करावी, असे त्यांनी ठणकावून सांगितले.