Sangram Jagtap : विकासाचा झंझावात सुरू : संग्राम जगताप

Sangram Jagtap : विकासाचा झंझावात सुरू - संग्राम जगताप

0
Sangram Jagtap : विकासाचा झंझावात सुरू - संग्राम जगताप
Sangram Jagtap : विकासाचा झंझावात सुरू - संग्राम जगताप

Sangram Jagtap : नगर : आपण नुकताच स्वातंत्र्य दिन (Independence Day) मोठ्या उत्साहात साजरा केला. एवढ्या वर्षांमध्ये नगर शहराच्या विकास कामासाठी इतिहासात पहिल्यांदाच १५० कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. या कामासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा दरवाजा वाजवला आणि त्यांनी तो उघडला व तो निधी नगर पर्यंत आला या माध्यमातून विकासाचा झंजावत सुरू झाला, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी केले.

Sangram Jagtap : विकासाचा झंझावात सुरू - संग्राम जगताप
Sangram Jagtap : विकासाचा झंझावात सुरू – संग्राम जगताप

नक्की वाचा: धक्कादायक! बदलापूरच्या शाळेत चार वर्षांच्या चिमुकल्यांवर अत्याचार

रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन

एकविरा चौक ते तपोवन रस्ता, जुना पिंपळगाव रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे, निखिल वारे, माजी नगरसेविका दीपाली बारस्कर, मीना चव्हाण, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, डॉ. सागर बोरुडे, सुनील त्रिंबके आदी उपस्थित होते.

Sangram Jagtap : विकासाचा झंझावात सुरू - संग्राम जगताप
Sangram Jagtap : विकासाचा झंझावात सुरू – संग्राम जगताप

अवश्य वाचा: जखणगाव अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

आमदार जगताप म्हणाले, (Sangram Jagtap)

रस्ता हा पूर्वी दुर्लक्षित होता या ठिकाणी अनेक पुढाऱ्यांनी नारळ फोडले. मात्र, त्या रस्त्याचे काम मीच पूर्ण केले. त्यामुळे नागरी वसाहती झपाट्याने वाढत आहे. तपोवन रस्ता हा बाजारपेठ म्हणून ओळखला जाईल. रस्त्यांची जाळे निर्माण केल्यानंतर व्यापारीकरण व रोजगार निर्मिती होत असते. डीपी रस्त्यांच्या विकास कामांबरोबर अंतर्गत रस्त्यांची कामे देखील हाती घेतली आहेत. या कामासाठी शासनाकडून ४४ कोटी रुपये मंजूर करून आणले आहेत, असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.

संपत बारस्कर म्हणाले की, सावेडी उपनगराच्या विकासाला आमदार संग्राम जगताप यांनी मोठा निधी मंजूर करून दिला असल्यामुळे गती प्राप्त झाली आहे. तपोवन रस्ता, एकविरा चौक, पारिजात चौक ते टेलिफोन ऑफिस पर्यंत रस्त्याचे काम मंजूर असून पहिल्या टप्प्यात तपोवन रोड ते एकविरा चौकापर्यंत पूर्ण होणार आहे. याचबरोबर तलाठी कार्यालय ते राजनंदिनी हॉटेलपर्यंतचा रस्ता देखील पूर्ण होणार आहे. पाऊलबुद्धे शाळा ते सिटी प्राईड हॉटेल पर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करण्याचे काम मार्गी लागणार आहे. लवकरात लवकर विकासाची कामे पूर्ण व्हावी यासाठी रात्रंदिवस काम चालणार आहेत तरी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here