Sangram Jagtap : कर्मचाऱ्यांनी चांगले काम करून संस्थेचा नावलौकिक वाढवावा : संग्राम जगताप

Sangram Jagtap : कर्मचाऱ्यांनी चांगले काम करून संस्थेचा नावलौकिक वाढवावा : संग्राम जगताप

0
Sangram Jagtap : कर्मचाऱ्यांनी चांगले काम करून संस्थेचा नावलौकिक वाढवावा : संग्राम जगताप
Sangram Jagtap : कर्मचाऱ्यांनी चांगले काम करून संस्थेचा नावलौकिक वाढवावा : संग्राम जगताप

Sangram Jagtap : नगर : महापालिकेमध्ये (AMC) लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार आणि उच्च न्यायालयाच्या (High Court) आदेशानुसार २० कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. सफाई कामगार (Cleaning Workers) वारस हक्काची अंमलबजावणी व्हावी, यासाठी युनियनच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला होता. कर्मचाऱ्यांनी चांगले काम करून संस्थेचे नावलौकिक वाढावावे. कर्मचाऱ्यांना वारस हक्काच्या नोकऱ्या मिळाव्यात यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केल्यामुळे ते शक्य झाले आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी केले.

नक्की वाचा : बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित;विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची घोषणा

२० कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले

महापालिकेत लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार २० कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी आयुक्त यशवंत डांगे, जल अभियंता परिमल निकम, आस्थापना विभाग प्रमुख मेहर लाहारे, युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, सचिव अनंद वायकर, नंदकुमार नेमाने, राहुल साबळे, बलराज गायकवाड़, ऋषिकेश भालेराव, भरत सारवान, बाबासाहेब राशिनकर, बाळासाहेब व्यापारी, महादेव कोतकर, दीपक मोहिते आदी उपस्थित होते.

अवश्य वाचा : माध्यमिक शिक्षक सोसायटीत ‘परिवर्तन’

आयुक्त यशवंत डांगे म्हणाले, (Sangram Jagtap)

महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. सातवा वेतन आयोग लागू झाल्यामुळे महापालिकेला १ कोटी ७५ लाख रुपये भरावे लागतात. वर्षाकाठी २० कोटी रुपये अतिरिक्त खर्च येत आहे. कर्मचाऱ्यांनी देखील संस्थेच्या हितासाठी काम करावे, असे ते म्हणाले.


अध्यक्ष बाबासाहेब मुदगल म्हणाले, न्यायालयाच्या आदेशानुसार कामगारांना नोकरीमध्ये सामावून घेण्यासाठी युनियनच्या माध्यमातून आमदार संग्राम जगताप यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विषय मार्गी लावून घेतला. आपल्या महापालिकेमुळे संपूर्ण राज्यातील मनपाला हा निर्णय घ्यावा लागला आहे.