Sangram Jagtap : स्वर्गीय तन्वी रासनेच्या कुटुंबियांना आमदार जगताप यांनी मिळवून दिली ४ लाखाची मदत

Sangram Jagtap : स्वर्गीय तन्वी रासनेच्या कुटुंबियांना आमदार जगताप यांनी मिळवून दिली ४ लाखाची मदत

0
Sangram Jagtap : स्वर्गीय तन्वी रासनेच्या कुटुंबियांना आमदार जगताप यांनी मिळवून दिली ४ लाखाची मदत
Sangram Jagtap : स्वर्गीय तन्वी रासनेच्या कुटुंबियांना आमदार जगताप यांनी मिळवून दिली ४ लाखाची मदत

Sangram Jagtap : अहिल्यानगर : गेल्या आठवड्यात पावसाने अनेक ठिकाणी नुकसान झाले. यातच नगर शहरातील सारसनगरमधील कु. तन्वी केदार रासने (वय १८) या युवतीचा स्लॅब कोसळून दुर्दैवी मृत्यू (Death) झाला होता. त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. अशातच आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी पाठपुरावा करून शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या (Relief and Rehabilitation Department) माध्यमातून रासने कुटुंबाला ४ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून दिली आहे.

नक्की वाचा : गृहकर्ज,वाहन कर्ज स्वस्त होणार;रिझर्व्ह बँकेने रेपो रेट घटवला

कुटुंबाला धनादेश केला सुपूर्द

स्व. तन्वी केदार रासने यांच्या कुटुंबाला शासनाच्या माध्यमातून मिळालेल्या ४ लाखांचा धनादेश आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, प्रांताधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय शिंदे, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, वडील केदार रासने, आई वैशाली रासने आदी उपस्थित होते.

अवश्य वाचा : क्रीडा क्षेत्राला चालना देण्याचे काम सरकार करत आहे : चंद्रशेखर बावनकुळे

रासने कुटुंब करणार गरजू विद्यार्थ्यांना मदत (Sangram Jagtap)

तन्वी रासनेच्या अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. तसेच परिसरातील नागरिकही तन्वीच्या जाण्याने शोक व्यक्त करत होते. नुकतीच तिने बारावी परीक्षा दिली होती तिला 86% गुणही मिळाले होते. अभ्यासात हुशार असणारी विद्यार्थिनी म्हणून तिची ओळख होती, रासने कुटुंब हे सदन असून त्यांनी मुलीच्या नावे ट्रस्ट स्थापन केले आहे. त्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली जाणार आहे, रासने कुटुंबीयांनी सामाजिक उपक्रमाचा घेतलेला निर्णय समाजाला दिशादर्शक आहे, अशी भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.