Sangram Jagtap : दर्जेदार कामांमुळे शहरात रस्त्यांचे जाळे निर्माण झाले: संग्राम जगताप

Sangram Jagtap : दर्जेदार कामांमुळे शहरात रस्त्यांचे जाळे निर्माण झाले: संग्राम जगताप

0
Sangram Jagtap : दर्जेदार कामांमुळे शहरात रस्त्यांचे जाळे निर्माण झाले: संग्राम जगताप
Sangram Jagtap : दर्जेदार कामांमुळे शहरात रस्त्यांचे जाळे निर्माण झाले: संग्राम जगताप

Sangram Jagtap : नगर : राज्यात महायुती (Mahayuti) सरकारकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे उपलब्ध झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या विकास निधीतून अहिल्यानगर शहरासह (Ahilyanagar City) केडगाव व सावेडी उपनगरांचा सुद्धा कायापालट होत आहे. शहरातील दुरवस्था झालेल्या रस्त्यांची कामे सुरु होण्याची पूर्ण शहरातील नागरिक वाट पहात होते. आता दर्जेदार रस्त्यांच्या कामांमुळे शहरात रस्त्यांचे जाळे निर्माण झाले आहे. अजूनही बऱ्याच रस्त्यांची कामे सुरु होणार आहेत, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी केले.

अवश्य वाचा : विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू; पाथर्डी तालुक्यातील घटना

१४० कोटीच्या निधीतून विविध रस्त्यांचे प्रश्न मार्गी

अहिल्यानगर शहरातील रस्त्यांच्या कामासाठी शासनाकडून उपलब्ध झालेल्या १४० कोटी रुपयांच्या निधीतून माळीवाडा येथील ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर परिसरातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा प्रारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते  झाला. यावेळी गणपती मंदिराचे महंत संगमनाथ महाराज, देवस्थाचे अध्यक्ष ॲड. अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोक कानडे, खजिनदार पांडुरंग नन्नवरे, प्रा.माणिक विधाते, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, छबूराव जाधव, विष्णुपत म्हस्के, बजरंग भूतारे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

नक्की वाचा : शाळेचे मुख्याध्यापक व व्यवस्थापक यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार

ॲड. अभय आगरकर म्हणाले, (Sangram Jagtap)

आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून माळीवाडा परिसराचा व शहराचा होत असलेला कायापालट कौतुकास्पद आहे. सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिर परिसरासाठी तीर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत निधी मिळावा यासाठी मी प्रस्ताव तयार केला आहे. त्यास मंजुरीसाठी आ. जगताप यांनी सहकार्य करून या वैभवात भर घालावी. 

अविनाश घुले म्हणाले, आ.संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून नगर शहराच्या इतिहासात कधीही झाले नाहीत, असे दर्जेदार रस्त्यांची कामे सुरु आहेत. ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर परिसरात होणाऱ्या दर्जेदार रस्त्यांमुळे या परिसराचे भाग्य उजळणार आहे. 

आमदार जगताप यांनी श्री विशाल गणपतीची आरती केली. यावेळी देवस्थानचे विश्वस्त रंगनाथ फुलसौंदर, ज्ञानेश्वर रासकर, बापुसाहेब एकाडे, चंद्रकांत फुलारे,  नितीन पुंड, संभाजी पवार, दत्ता पाटील, मनापा शहर अभियंता मनोज पारखे, उपअभियंता श्रीकांत निंबाळकर, सुहास पाथरकर, राजू कचरे आदींसह नागरिक उपस्थित होते.