Sangram Jagtap : एमआयडीसी मधील गंभीर प्रश्‍नांवर आमदार जगताप यांच्याशी उद्योजकांची चर्चा

Sangram Jagtap : एमआयडीसी मधील गंभीर प्रश्‍नांवर आमदार जगताप यांच्याशी उद्योजकांची चर्चा

0
Sangram Jagtap : एमआयडीसी मधील गंभीर प्रश्‍नांवर आमदार जगताप यांच्याशी उद्योजकांची चर्चा
Sangram Jagtap : एमआयडीसी मधील गंभीर प्रश्‍नांवर आमदार जगताप यांच्याशी उद्योजकांची चर्चा

Sangram Jagtap : नगर : ‘आमी’ संघटनेच्या पुढाकारातून शहराचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्याशी उद्योजकांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत उद्योजकांनी गुंडगिरी व अवैध धंदे बंद होण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. गुन्हेगारीचे (Criminal) केंद्र बनत चाललेल्या अवैध धंदे (Illegal business) चालविणाऱ्या टपऱ्यांचे अतिक्रमण हटविण्याची मागणी देखील उद्योजकांनी (Industrialist) लावून धरली.

अवश्य वाचा: ‘बदलापूरच्या घटनेत राजकारण आहे म्हणणारेही विकृत’; उद्धव ठाकरेंचा संताप

गुन्हेगारीचे प्रमाण वाढले (Sangram Jagtap)

एमआयडीसीमध्ये अवैध धंदे चालविणारे अनाधिकृत टपऱ्या वाढल्या असताना गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. या टपऱ्यांमध्ये दारू, चरस, गांजा, अफू असे अमली पदार्थ विकले जातात. त्याचे सेवन करून गुन्हेगारीचे प्रमाण या परिसरात वाढत आहे. या सर्वांमुळे एमआयडीसी मधील कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न देखील गंभीर झाला असल्याचे उद्योजकांनी स्पष्ट केले.

नक्की वाचा: ‘आमचा मुलगा निर्दोष आहे’,बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या आई-वडिलांचा मोठा दावा

एमआयडीसीत कंपन्यातून सर्रासपणे चोऱ्यांच्या घटना (Sangram Jagtap)

एमआयडीसीत कंपन्यातून चोऱ्यांच्या घटना सर्रासपणे घडत आहे. विशेषतः बंद पडलेल्या कंपन्यांमध्ये वारंवार चोऱ्या होत आहेत. नुकतेच कामावरून परतणाऱ्या तीन कामगारांना रस्त्यात अडवून मारहाण करण्यात आली. यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तसेच एमआयडीसीसाठी दोन गावांच्या ग्रामपंचायती आहेत. त्यांचा मालमत्ताकर वेगवेगळ्या तीन गाव मिळून करत असताना एकच मालमत्ता कर लागू करावा. एमआयडीसीसाठी एमएसईबीचे सबस्टेशन मंजूर आहे. मात्र, जागे अभावी सबस्टेशन होत नाही. त्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी.सनफार्मा चौक ते निबळक बायपास रस्त्याची खूप दुरावस्था झाली आहे. तो रस्ता दुरुस्त करावा. अपघात टाळण्यासाठी सनफार्मा चौकामधील सिग्नल चालू करावेत, एमआयडीसी मध्ये अंतर्गत (ब्लॉक) प्रमाणे बस सेवा चालू करण्याची मागणी ‘आमी’चे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ यांनी केली.

या बैठकीसाठी उद्योजकांच्या ‘आमी’ संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ  खाकाळ, संजय बंदिष्टी, राजेंद्र कटारिया, सुमित लोढा, रवींद्र बक्षी, सतीश गवळी, सागर निंबाळकर, आकाश जोशी, दीपक नागरगोजे, सचिन पाठक, प्रफुल्ल पारख आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here