Sangram Jagtap : आमदार संग्राम जगताप यांच्या जीवितास धोका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पोलीस अधीक्षकांकडे संरक्षणाची मागणी

Sangram Jagtap : आमदार संग्राम जगताप यांच्या जीवितास धोका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पोलीस अधीक्षकांकडे संरक्षणाची मागणी

0

Sangram Jagtap : नगर : आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांना दोन दिवसात मारू असा मेसेज अज्ञात नंबरवरून त्याचे पीए सुहास शिरसाठ (Suhas Shirsath) यांच्या मोबाईलवर आला आहे. त्यामुळे आमदार जगताप यांच्या जीवितास धोका असल्याचे सांगून पोलीस प्रशासनाने त्यांच्या सुरक्षेसाठी तात्काळ उपाय योजना कराव्या, तसेच चितावणीखोर वक्तव्य करणाऱ्या व धमकी देणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी. अशी मागणी अहिल्यानगर शहर राष्ट्रवादीच्या काँग्रेस (NCP) वतीने करण्यात पोलीस अधीक्षकांकडे (SP) निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Sangram Jagtap : आमदार संग्राम जगताप यांच्या जीवितास धोका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पोलीस अधीक्षकांकडे संरक्षणाची मागणी
Sangram Jagtap : आमदार संग्राम जगताप यांच्या जीवितास धोका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पोलीस अधीक्षकांकडे संरक्षणाची मागणी

नक्की वाचा : ‘नारायण राणेंच्या नेपाळ्यासारख्या टिल्ल्या लेकाने नाक घासून माफी मागावी’- संजय राऊत

तातडीने अटक करावी

दौंड येथील बादशाह या नावाच्या व्यक्तीला तातडीने पोलिसांनी अटक करावी, अन्यथा आम्ही त्याला घेऊन पोलीस प्रशासनाच्या ताब्यात देऊ. फेक अकाउंटवर देखील कारवाई करावी. अन्यथा अशा लोकांना धडा शिकवण्याचे काम केले जाईल. असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर व माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी पोलीस प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे.

Sangram Jagtap : आमदार संग्राम जगताप यांच्या जीवितास धोका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पोलीस अधीक्षकांकडे संरक्षणाची मागणी
Sangram Jagtap : आमदार संग्राम जगताप यांच्या जीवितास धोका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पोलीस अधीक्षकांकडे संरक्षणाची मागणी

अवश्य वाचा : वाल्मिक कराडला करायची होती धनंजय मुंडेंच्या पीएची हत्या; विजयसिंह बांगर यांचा खुलासा

यावेळी उपस्थिती (Sangram Jagtap)

यावेळी माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, विनीत पाऊलबुद्धे, अविनाश घुले, अजिंक्य बोरकर, आशाताई निंबाळकर, माणिक विधाते, बाळासाहेब पवार, सुरेश बनसोडे, दिपक खेडकर, रेश्मा आठरे, सागर बोरुडे, साधनाताई बोरुडे, मयुर बांगरे, लतिका पवार, युवराज शिंदे, सनी कोवळे, नितीन घोडके, राजेश भालेराव, श्रेणिक शिंगवी, गिरीश जगताप, महेश गलांडे, अंजली आव्हाड, धीरज उकिर्डे, मारुती पवार, सुंनदा शिरवळे आदी उपस्थित होते.

निवेदनात पुढे म्हणले की, (Sangram Jagtap)

शहराचे आमदार संग्राम जगताप हे हिंदू धर्माच्या प्रचाराकरिता ठिकठिकाणी सभा मोर्चे व काही ठिकाणी आरत्या करण्याकरिता महाराष्ट्रभर जात असतात. मंदिरांमध्ये हिंदू जनसमुदाय सहित आरती अगर दर्शनाकरिता जात असतात. त्यामुळे त्यांना काही विशिष्ट धर्मातील लोकांनी जाणिवपुर्वक टार्गेट केले असल्याचे दिसून येत आहे. काही व्यक्तींनी प्रसार माध्यमांवर त्यांच्या धर्माच्या बाजुने व जाणिवपुर्वक आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात चितावणीखोर वक्तव्ये केलेली आहेत. त्यामध्ये त्यांनी प्रसार माध्यमांसमोर आमदार संग्राम जगताप यांना आम्ही गर्दीतुन गोळी मारु असे वक्तव्ये केलेले आहे. त्यानंतर लगेचच काल आमदार संग्राम जगताप यांचे स्वीय सहायक सुहास शिरसाठ यांना त्यांच्या मोबाईलवर २ दिन के अंदर संग्राम को खतम करूंगा आशा आशयाचा टेक्स्ट मेसेज अनोळखी व्यक्तीने केला आहे.

तरी आम्ही समस्त सकल हिंदु समाज, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने आपणास निवेदन देतो की काही विशिष्ट धर्माचे लोक हे जाणिवपुर्वक आमदार संग्राम जगताप यांना टार्गेट करुन त्यांच्या जिवाला काही धोका निर्माण होईल अशी वक्तव्ये करत असुन त्या चिथावणीतुन आमदार संग्राम जगताप यांच्या जिवितास धोका निर्माण झालेला आहे. तसेच हे धमक्या देणाऱ्या लोकांपासुन त्यांच्या कुटुंबियांच्या जिवितास ही घातपात होण्याबाबत शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे धमकी देणारे व्यक्ती व त्यांना चिथावणी देणाऱ्या व्यक्ती यांच्यावर कठोरातील कठोर करवाई तातडीने करण्यात यावी.

आमदार संग्राम जगताप यांची व त्यांच्या कुटुंबियांची संरक्षणाची जबाबदारी पोलिस प्रशासनाने घ्यावी. त्या करिता लागणाऱ्या आवश्यक उपाययोजना तातडीने करण्यात याव्या. सुहास शिरसाठ यांच्या मोबाईलवर ज्या अनोळखी व्यक्तीने धमकी दिली त्या व्यक्तीला आणखी कोण मदत करत आहे किंवा त्याच्या संपर्कात अजुन कोण आहे का? याबाबतीत ही योग्य तो तपास करण्यात यावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे निवेद्वनाद्वारे केली आहे.