Sangram Jagtap | मोबाईल असोसिएशनने राज्यात सर्वात मोठी रक्तदानाची लोक चळवळ उभी केली : आमदार संग्राम जगताप 

0
Sangram Jagtap
Sangram Jagtap

Sangram Jagtap | नगर : मोबाईल असोसिएशनने राज्यात सर्वात मोठी रक्तदानाची लोक चळवळ उभी केली आहे. त्यामुळे अहिल्यानगर शहराचा नावलौकिक वाढला आहे. जिल्हाभरातून पाच हजार रक्तदात्यांनी रक्तदानाचा हक्क बजावला आहे. ही बाब कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी केले. 

हेही वाचा – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचे 27 जुलै रोजी अनावर; उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहणार – आमदार संग्राम जगताप

महारक्तदान शिबिराचे आयोजन (Sangram Jagtap)

टिळक रोड येथील नंदनवन लॉन येथे अहिल्यानगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या वतीने महा रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, आयुक्त यशवंत डांगे, माजी उपमहापौर गणेश भोसले, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, महंत संगमनाथ, आयुर्वेद शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सचिन जगताप, जिल्हा लेबर फेडरेशनचे उपाध्यक्ष विकी जगताप, महाराष्ट्र राज्य मोबाईल असोसिएशनचे अध्यक्ष अजित जगताप, जिल्हाध्यक्ष अजित पवार, उद्योजक राजेश भंडारी, माजी सभापती अविनाश घुले, प्राध्यापक माणिक विधाते, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, संभाजी पवार, बाळासाहेब बारस्कर, निखिल वारे, बाळासाहेब पवार, दत्ता जाधव, संजय जाधव, सुनील त्रिंबके, डॉ. सोनाली बांगर, मीनाताई मुनोत, कमलेश भिंगारवाला, अनिल पोखरणा, ब्रिगेडर जोगिंदर सिंग, गोरख पडोळे, अमित बुरा आदी उपस्थित होते.

अवश्य वाचा – एनएचएम कर्मचाऱ्यांसाठी खासदार लंके यांचे केंद्राला साकडे; केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पत्र

दहा रक्तपेढी (Sangram Jagtap)

जिल्हाधिकारी पंकज आशिया म्हणाले की, अहिल्यानगर मोबाईल असोसिएशनचा उपक्रम कौतुकास्पद आहे. सर्व व्यावसायिक एकत्रित येऊन लोकचळवळ उभी करीत समाजामध्ये रक्तदानाबाबत जनजागृती करत आहे. जिल्ह्यामध्ये दहा रक्तपेढी असून युवकांनी पुढे येऊन रक्तदानाचा हक्क बजावावा, असे ते म्हणाले.जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे म्हणाले की, देवाने आपल्या सर्वांना एक सारखेच लाल रक्त दिले आहे. या माध्यमातून ज्यांना कोणाला रक्ताची गरज पडत असते तेव्हा आपण रक्त देत असतो आणि त्या व्यक्तीचे प्राण वाचत असतो. एवढा मोठा रक्तदानाचा कार्यक्रम मी यापूर्वी कधीही पाहिला नाही, अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून रक्तदान ही लोक चळवळ उभे राहील. 

रक्तदानाची चळवळ (Sangram Jagtap)

उद्योजक नरेंद्र फिरोदिया म्हणाले, अहिल्यानगर जिल्ह्याने राज्याला व देशाला दिशा देणारे पॅटर्न निर्माण केले आहे. मोबाईल असोसिएशनने रक्तदानाची चळवळ उभी करत समाजाला दिशा व प्रेरणा देणारा उपक्रम ठरला आहे. या माध्यमातून कोणाचा तरी जीव वाचला जाणार आहे असल्याचे ते म्हणाले. 

अजित जगताप म्हणाले की, आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकारातून व त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या चार वर्षांपासून अहिल्यानगर मोबाईल असोसिएशनच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे. पहिल्या वर्षी आम्ही एकत्र येत १५० रक्तदात्यांनी रक्तदान केले होते. दुसऱ्या वर्षी १ हजार ५००, तिसऱ्या वर्षी तीन हजार तर यावर्षी पाच हजार रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचा संकल्प केलेला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मोबाईल असोसिएशनच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिर ही काळाची गरज बनली आहे. सध्या नागरिक विविध आजाराला सामोरे जात असून त्यांना वेळोवेळी रक्ताची गरज भासत आहे. मोबाईल असोसिएशनचे सर्व व्यवसायिक एक दिवस दुकान बंद ठेवून रक्तदान कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित बुरा यांनी केले. प्रसाद बेडेकर यांनी सूत्रसंचालन तर अजित पवार यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here