Sangram Jagtap : नगर : दैनंदिन प्रशासकीय कामकाज करताना लोकशाही (Democratic) प्रक्रियेतील निवडणुका (Election), वादविवादाच्या प्रकरणात निवाडे असो किंवा योजनांची अंमलबजावणी प्रशासकीय दैनंदिन कामकाज असो, महसूल विभाग (Revenue Department) व त्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे योगदान महत्वाचे आहे. सरकार चालविण्यात महसूल विभागाचे काम सर्वात महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी केले. जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात शुक्रवारी (ता.१) अहिल्यानगर प्रांताधिकारी कार्यालय व अहिल्यानगर उपविभाग तहसील कार्यालयाच्या वतीने महसूल दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते.
नक्की वाचा : भिंगार शहरासाठी उड्डाणपूलाची मागणी; खासदार लंके यांनी वेधले मंत्री नितीन गडकरींचे लक्ष
राजकीय पदाधिकारी व शासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती
यावेळी अहिल्यानगर उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय शिंदे, अपर तहसीलदार स्वप्निल ढवळे, साहित्यिक संजय कळमकर, पत्रकार महेश देशपांडे महाराज, अहिल्यानगर मनपा स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, नायब तहसीलदार अभिजीत वांढेकर, कैलास साळुंके, सुधीर उबाळे, पुरवठा निरीक्षण अधिकारी शिवराज पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस दीपप्रज्वलन करीत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
अवश्य वाचा : नाफेड कांदा खरेदीतील दोषींवर कारवाई करा: अनिल घनवट
महसूल दिनाच्या शुभेच्छा देत आमदार जगताप म्हणाले, (Sangram Jagtap)
अलीकडच्या काळात महसूल विभागाचे कामकाज ताण-तणावाचे झाले आहे. बनावट दस्तऐवज करून फसवणुकीचे प्रकार वाढू लागले आहेत. अशा प्रकरणात संबंधित दस्तऐवजाची शाई तपासणे, फॉरेन्सिक तपासणी करावी, खोटा प्रकार आढळल्यास संबंधितावर अजामीन पात्र गुन्हा दाखल होणे, यासाठी आपण सरकार दरबारी प्रयत्न करणार आहोत. महसूल विभागातील रिक्त पदांची भरती होण्यासाठी देखील आपण पाठपुरावा करू. महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी न्यायाच्या भूमिकेवर ठाम राहून सांघिक स्वरूपात काम करावे, असे आवाहन जगताप यांनी यावेळी केले. प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी ‘आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करीत पारदर्शी-गतिमान कामकाजातून महसूल विभागाची उज्वल प्रतिम स्थापन करण्यासाठी सर्वांनी ‘सेवा हीच साधना’ समजून सर्वांनी काम करावे, असे आवाहन केले.
यावेळी युवा नेते अक्षय कर्डिले, ज्येष्ठ पत्रकार महेश देशपांडे, साहित्यिक संजय कळमकर यांनी तर महसूल कर्मचाऱ्यातून सहायक महसूल अधिकारी सोनाली कुलकर्णी, मंडळ अधिकारी रुपाली टेमक, राज्य महसूल संघटनेचे उपाध्यक्ष अक्षय फलके यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात अहिल्यानगर उपविभाग व अहिल्यानगर तहसील कार्यालयातील उत्कृष्ट काम करणाऱ्या नायब तहसीलदार कैलास साळुंके, सुधीर उबाळे, गणेश भानवसे, पुरवठा निरीक्षण अधिकारी शिवराज पवार, प्रांताधिकारी यांचे स्वीय सहायक विकास साळवे, मंडल अधिकारी रूपाली टेमक, वर्षा पवार, सहाय्यक महसूल अधिकारी नंदकुमार साठे, शरद झावरे, शुभांगी बेद्रे, श्रद्धा सुभेदार, कल्याणी उदगिरी, सीमा जाधव, सुनिता डावरे, ग्राम महसूल अधिकारी राहुल कोळेकर, ज्ञानेश्वर रोहकले, महसूल सहाय्यक अक्षय फलके, आरती देशमुख, हरिभाऊ शिंदे, प्रशांत वाकचौरे, तांत्रिक अभियंता महेश आळकुटे, महसूल सेवक अनिल ससे, आकाश कर्पे, देवेंद्र परदेशी, योगेश शिरसाठ, अमोल येमूल, किशोर गायकवाड, प्रभाकर गोंधळे, वाहनचालक सुजित परुळेकर, आपासाहेब खरात, रवींद्र गोफणे यांच्यासह महसूल विभागातील विशेष प्राविण्य प्राप्त कर्मचारी प्रताप कळसे, बाळासाहेब नांदुरकर, मनोज मिसाळ, संगणक परिचालक दिनेश पिंगळे, हर्षदा पाठक, सोनाली वरकड, आकांक्षा केरूळकर, सुप्रिया सरोदे यांचा प्रशस्तीपत्रकासह गौरव करण्यात आला. प्रास्ताविक नगर तहसीलदार संजय शिंदे यांनी केले. तर सूत्रसंचालन माधवी पुंढे यांनी तर नायब तहसीलदार अभिजीत वांढेकर यांनी आभार मानले.