Sangram Jagtap : खेळांडूंसाठी अद्यावत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स लवकरच उपलब्ध होणार : आमदार जगताप

Sangram Jagtap : खेळांडूंसाठी अद्यावत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स लवकरच उपलब्ध होणार : आमदार जगताप

0
Sangram Jagtap : खेळांडूंसाठी अद्यावत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स लवकरच उपलब्ध होणार : आमदार जगताप
Sangram Jagtap : खेळांडूंसाठी अद्यावत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स लवकरच उपलब्ध होणार : आमदार जगताप

Sangram Jagtap : नगर : शहरातील खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करत विविध क्रीडा स्पर्धांमध्ये (Sports Competitions) नैपुण्य मिळवत नगरचे नावलौकिक वाढवत आहेत. खेळाडूंच्या पाठीशी कायम उभे राहून त्यांना प्रोत्साहन देत आहे. खेळाडूंना चांगल्या सोई सुविधांसह सरावा करता यावा यासाठी अहिल्यानगर शहरात सर्वप्रकारच्या खेळांसाठी अद्यावत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स लवकरच उपलब्ध होणार आहेत. या अद्यावत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा (Sports Complex) लाभ सर्व खेळाडूंनी घेत अजून चांगली कामगिरी करावी, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी केले.

अवश्य वाचा : रस्ते विकासासाठी खासदार नीलेश लंके यांची केंद्रीय मंत्री गडकरींकडे मागणी

खेळाडूंचे आमदार जगताप यांनी केला सत्कार 

नुकत्याच कोल्हापूर येथे झालेल्या सब ज्युनियर महाराष्ट्र राज्य कुराश स्पर्धेत अहिल्यानगर संघाने उपविजेतेपद मिळवत भरघोस पदकांची कमाई केली. या उपविजेत्या संघातील खेळाडूंचे आमदार जगताप यांनी सत्कार केला. यावेळी खेळाडूंचे प्रशिक्षक आंतरराष्ट्रीय खेळाडू आदित्य धोपावकर, महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या अहिल्यानगरचे सचिव निलेश मदने, उत्तर महाराष्ट्र केसरी युवराज करंजुले, प्रा. माणिक  विधाते आदींसह खेळाडू व पालक उपस्थित होते.

नक्की वाचा : शेअर मार्केटच्या नावाखाली ५० लाखांची फसवणूक

विजेत्या खेळाडूंचा सन्मान (Sangram Jagtap)

याप्रसंगी सुवर्णपदक प्राप्त अनुज बोगा, सम्राट करंजुले, ऋचा बोगा, सिद्धी दातरंगे व युवराज आव्हाड, रौप्य पदक प्राप्त आर्या शिंदे, यशराज गोंधळे, वंश बोरा, खनिका गुप्ता व श्लोक सब्बन. कास्यपदक प्राप्त मल्हार सुरसे, ओम पोकळे, अनन्या लखापती व अमृता झिंजे या विजेत्या खेळाडूंचा सन्मान केला.