Sangram Jagtap : नगर : अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्ग (Ahilyanagar to Chhatrapati Sambhajinagar Highway) हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून, त्यावरून दररोज हजारो वाहने प्रवास करतात. गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यावर अक्षरशः मोठमोठे खड्डे पडले आहेत. चालकांना खड्डे चुकवताना अपघातांचा धोका निर्माण होत आहे. अनेक नागरिकांना याचा फटका बसला आहे. त्यामुळे तातडीने रस्त्याचे पॅचिंग सुरू करण्याची गरज होती. या रस्त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आदेश दिले होते. आजपासून महामार्गाच्या पॅचिंग कामाला प्रारंभ झाला असून या पॅचिंगच्या कामाची आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी पाहणी केली.
नक्की वाचा : रस्ता लूट करणारी टोळी जेरबंद; ११ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी नगरसेवक निखिल वारे, तसेच अधिकारी आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर या जिल्हयाला जोडणाऱ्या महत्त्वाच्या महामार्गाची दुरवस्था लक्षात घेऊन आ. जगताप यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
अवश्य वाचा : पुण्यात मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याची दारु पिऊन सहा गाड्यांना धडक
कामे लवकरच पूर्ण होणार (Sangram Jagtap)
गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यावर अक्षरशः मोठमोठे खड्डे पडले आहेत. चालकांना खड्डे चुकवताना अपघातांचा धोका निर्माण होत आहे. अनेक नागरिकांना याचा फटका बसला आहे. त्यामुळे तातडीने रस्त्याचे पॅचिंग सुरू करण्याची गरज होती. पावसाळ्याच्या काळात काम करणे कठीण होते. मात्र, आता पाऊस ओसरला असून, जलद गतीने खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात अहिल्यानगर शहर ते नेवासा फाटा पर्यंतचा रस्ता पूर्ण केला जाईल, त्यानंतर उर्वरित भागाची कामे लवकरच पूर्ण होणार आहे.