Sangram Jagtap : गोपाळकाला हा सामाजिक ऐक्याचा काला – संग्राम जगताप

Sangram Jagtap : गोपाळकाला हा सामाजिक ऐक्याचा काला - संग्राम जगताप

0
Sangram Jagtap

Sangram Jagtap : नगर : गोपाळकाला हा सामाजिक ऐक्याचा काला आहे. पुरातन काळापासून रुढी परंपरा (Tradition) पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरतात. सर्व जाती धर्मातील भेदभाव विसरून त्याकाळी श्रीकृष्णाने (Shri Krishna) गोपाळकाल्याची क्रांती घडवून आणली. त्या माध्यमातून बाळ गोपाळाचे आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यासाठी दही, दूध, तूप, लोणी आहारामध्ये मिळाले. सात हजार वर्षांपूर्वी हा आरोग्यदायी संदेश भगवान श्री कृष्णाने आपल्याला दिला, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी केले.

नक्की वाचा: बनावट सोन्याचे बिस्कीट देत फसवणूक करणारा गजाआड

गोकुळअष्टमी निमित्त विद्यार्थ्यांच्या हस्ते दहीहंडी

पाईपलाईन रस्ता येथील जय बजरंग विद्यालय येथे गोकुळअष्टमी निमित्त विद्यार्थ्यांच्या हस्ते दहीहंडी कार्यक्रम झाला. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे मार्गदर्शक नितीन शेलार, प्रा. संगीता पाठक, मुख्याध्यापिका वर्षा कुसळकर, मुख्याध्यापक अमोल क्षीरसागर, अर्जुन मदान, हरिश नायर, किरण बारस्कर, अशितोष घाणेकर, राहुल मोरे, कल्पना मिसाळ, सुरेखा दुधाडे, शीतल मोरे, अश्विनी बेरड, आशा घुले, छाया क्षीरसागर, ऋतुजा हारकर आदी उपस्थित होते.

Sangram Jagtap

अवश्य वाचा: दीपक केसरकरांच्या वक्तव्यावरून संजय राऊत भडकले; म्हणाले …

आमदार जगताप म्हणाले (Sangram Jagtap)

आपल्या राज्याची संस्कृती परंपरा महान असून तिचे जतन होणे गरजेचे आहे. जय बजरंग विद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम करत असतात. त्यांच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थी घडले आहेत. आजच्या विद्यार्थ्यांना आपली संस्कृती, परंपरा व धार्मिकता कळावी व त्याचे महत्त्व समजावे यासाठी आपल्या सर्वांना काम करावे लागणार आहे. आजची पिढी ही उद्याच्या भारताचे भविष्य आहे, असे विचार त्यांनी व्यक्त केले.

Sangram Jagtap

नितीन शेलार म्हणाले की, जय बजरंग विद्यालयातर्फे वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते या माध्यमातून विद्यार्थी घडला जात असतो. त्यांच्यावर संस्कार होण्याचे काम होत असते. गोकुळअष्टमी निमित्त विद्यार्थ्यांच्या हस्ते दहीहंडी फोडत जन्मोत्सव साजरा केला. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार केला. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले. अमोल क्षीरसागर यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. कल्पना मिसाळ यांनी सूत्रसंचालन आणि अश्विनी बेरड यांनी आभार मानले.