Sangram Jagtap : नगर : शहरातील कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून ८० घंटागाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. या माध्यमातून कचरा संकलनाचे काम सुरू आहे. इंदोर (Indore) शहराच्या धर्तीवर महापालिकेच्या माध्यमातून काम सुरू करण्यात आले आहेत. पुढील काळात रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर महापालिका प्रशासन (Municipal Administration) दंडात्मक कारवाई करेल, असा इशारा आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी दिला आहे.
अवश्य वाचा: दुबार मतदान कसं रोखलं जाणार? निवडणूक आयोगाने सांगितला प्लॅन
स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित
अहिल्यानगर महापालिकेच्या वतीने पाईपलाईन रोड, श्रीराम चौक, एकविरा चौक, संघर्ष चौक, नामदे चौक, छत्रपती संभाजी महामार्गापर्यंत स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी आमदार संग्राम जगताप, आयुक्त यशवंत डांगे, उपयुक्त संतोष टेंगळे, माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, बाळासाहेब बारस्कर, सुनील त्रिंबके, संपत नलवडे, योगेश ठुबे, घनकचरा विभाग प्रमुख अशोक साबळे, अतिक्रमण विभाग प्रमुख सुरेश इथापे आदीसह स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नक्की वाचा : नगरपालिका,नगरपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला;आचारसंहिता लागू
आयुक्त यशवंत डांगे म्हणले की,
संत गाडगेबाबा यांनी आपल्या कीर्तनातून समाजाला स्वच्छतेचे महत्व पटवून दिले होते, आजही आपण सर्वजण स्वच्छतेवरच काम करत आहोत प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्यास आपले शहर, स्वच्छ सुंदर होण्यास वेळ लागणार नाही. महापालिकेने दैनंदिन स्वच्छतेबरोबर शहरात स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. तरी नागरिकांनी आपापल्या भागामध्ये स्वच्छता मोहीम राबवावी आणि घंटागाडीतच कचरा टाकावा, असे ते म्हणाले.



