Sangram Jagtap : अग्निशमन यंत्रणा अत्याधुनिक करण्याची राज्य सरकारकडे मागणी : आमदार संग्राम जगताप

Sangram Jagtap : अग्निशमन यंत्रणा अत्याधुनिक करण्याची राज्य सरकारकडे मागणी : आमदार संग्राम जगताप

0
Sangram Jagtap : अग्निशमन यंत्रणा अत्याधुनिक करण्याची राज्य सरकारकडे मागणी : आमदार संग्राम जगताप
Sangram Jagtap : अग्निशमन यंत्रणा अत्याधुनिक करण्याची राज्य सरकारकडे मागणी : आमदार संग्राम जगताप

Sangram Jagtap : नगर : शहरात आता मोठमोठ्या बहुमजली इमारती उभ्या राहत असल्याने महापालिकेची अग्निशमन यंत्रणेचे (Fire Fighting System) अजून बळकटीकरण, अधिक सुसज्ज व अत्याधुनिक करण्याची गरज आहे. तसेच प्रशिक्षित तांत्रिक कर्मचाऱ्यांचीही कमतरता भासत आहे. याची मागणी मागच्या अधिवेशनात राज्य सरकारकडे (State Government) केली आहे. बुरुडगल्लीमध्ये जुन्या इमारतीला लागलेल्या आगीत चंगेडीया परिवाराचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. शासनाकडून त्यांना मदत मिळण्यासाठी प्रयत्न करू, अशी महिती आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी दिली.

अवश्य वाचा: धनंजय मुंडे यांची हत्या झाली असती पण ते वाचले; रासप आमदाराच्या दाव्याने खळबळ

घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी

मंगळवारी (ता. २) सकाळी बुरुडगल्ली मधील चंगेडीया परिवाराच्या जुन्या इमारतीला आग लागण्याची घटना घडल्यावर आमदार संग्राम जगताप यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच चंगेडीया परिवाराची भेट घेऊन त्यांना आधार दिला. यावेळी सचिन चंगेडीया, बाळू भंडारी, माजी सभापती अविनाश घुले, माजी नगरसेवक सुनील त्रिंबके, आर.के रासकर, आसाराम रासकर आदीसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

नक्की वाचा : रोहित पवारांना त्यांचा पराभव दिसू लागलाय; राम शिंदेंनी साधला निशाणा

यंत्रणा बळकट करण्यासाठी पाठपुरावा करणार (Sangram Jagtap)

महापालिकेची अग्निशमन यंत्रणेचे अधिक बळकट करण्यासाठी त्याचा पाठपुरावा सुरू आहे. नव्या इमारतीमध्ये आग प्रतिबंध यंत्रांना असते. पण जुन्या इमारती असल्याने लवकर आग नियंत्रणात येत नाही. अशा घटना घडू नये, यासाठी काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here