
Sangram Jagtap : नगर : शहर सहकारी बँकेने (Shahar Sahakari Bank) सातत्याने शहरातील व्यावसायिक, उद्योजक आणि सर्वसामान्यांना आर्थिक आधार दिला आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) बँकेच्या पाच शाखा कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून शहरीकरण आणि व्यावसायिक वाढीला चालना मिळत असल्याचे, प्रतिपादन आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी केले आहे.
अवश्य वाचा : शिर्डीत एका महिलेच्या नावे दुसऱ्याच व्यक्तीने केले मतदान
बँकेच्या उपाध्यक्षपदी प्रा. माणिक विधाते
शहर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी प्रा. माणिक विधाते यांची संचालक मंडळाने एकमताने बिनविरोध निवड केली. त्यांच्या या निवडीबद्दल आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते प्रा. विधाते यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष निवडीच्या कार्यक्रमास जिल्हा उपनिबंधक व निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे, बँकेचे अध्यक्ष सीए गिरीश घैसास, ज्येष्ठ संचालक सुभाष गुंदेचा, अशोक कानडे, संजय घुले, सुजित बेडेकर, शिवाजी कदम, निखिल नहार, संचालिका रेश्मा आठरे, स्वाती कांबळे, संचालक डॉ. भूषण अनभुले, प्रदीप जाधव, दत्तात्रय रासकोंडा, सीईओ दिनेश लोखंडे, कर्मचारी प्रतिनिधी संतोष मखरे, राजेंद्र गायकवाड, प्रकाश वैरागर, महेश पालवे तसेच अनिल मुरकुटे, देविदास पारधे, गणेश गोंडाळ आदी उपस्थित होते.
नक्की वाचा : जिल्ह्यात ४ डिसेंबरपर्यंत थंडीच्या लाटेची शक्यता; दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
उपाध्यक्ष प्रा.विधाते म्हणाले की, (Sangram Jagtap)
बँकेचे अध्यक्ष सीए गिरीश घैसास आणि ज्येष्ठ संचालक सुभाष गुंदेचा यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यमान आर्थिक परिस्थिती अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक ती सुधारणा व ठोस पावले उचलली जातील. सेवक वर्ग, अधिकारी व संचालक मंडळाच्या सहकार्याने परिस्थिती आणखी सुधारण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


